शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात राहुल गांधी यांनी ‘सी फूड’वर मारला ताव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:05 IST

लोकांबरोबर सेल्फी : रेस्टॉरंटमधील भेट ठरला चर्चेचा विषय; सुरक्षा रक्षकाविना सोनिया, राहुल गांधी यांना पाहून सर्वांनाच आश्चर्य

मडगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासह गोव्यात विश्रांतीसाठी आले असून, रविवारी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये माशांवर ताव मारला. कोणत्याही सुरक्षा रक्षकाविना दोघांना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.ते दोघे तीन दिवसांच्या खासगी गोवा भेटीवर असून, हॉटेल लीलामध्ये उतरले आहेत. जेवायला गेले, तेव्हा राहुल कॅज्युअल निळ्या टी शर्टमध्ये होते. या दोन्ही काँग्रेस नेत्यांबरोबर काही जणांनी ‘सेल्फी’ही घेतल्या. ही माहिती मडगावच्या डेंटिस्ट डॉ. रचना फर्नांडिस यांनी इन्स्टाग्रामवरून उघड केली. त्यांनीही राहुल यांच्याकडे ‘सेल्फी’चा आग्रह केला असता, रेस्टॉरंटचे बिल भरल्यानंतर फोटो काढणे चालेल का, असे त्यांनी नम्रपणे विचारले. बिल भरल्यावर लगेचच त्यांनी आपल्याबरोबर सेल्फी काढला. गोवा हे गांधी कुटुंबाचे आवडते विश्रांती स्थळ आहे. दर ३१ डिसेंबरला सोनिया गांधी याच हॉटेलमध्ये उतरतात. त्यांच्याबरोबर प्रियंका गांधीही असतात. यावेळी प्रथमच राहुल गांधी आहेत. उद्या, मंगळवारी ते दिल्लीला परतणार आहेत.ती ऑडिओ क्लिप अस्सलचराफेल विमान सौद्यातील फाइल्स गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहेत, यासंबंधी वाच्यता करणारा आॅडिओ अस्सल असून आपली खुर्ची सांभाळण्यासाठी पर्रीकर या स्फोटक गुप्त माहितीचा वापर करीत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.ही ऑडिओ क्लिप लोकांसमोर आणून ३0 दिवस उलटले, तरीही अद्याप कुणावरही एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही किंवा कोणत्या मंत्र्यावरही कारवाई झालेली नाही, याचा उल्लेख त्यांनी केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीgoaगोवा