शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार

By समीर नाईक | Updated: January 2, 2024 16:37 IST

पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली.

पणजी: गेल्या वर्षीचा पर्पल फेस्ट हा एक साक्षात्कार होता. या उपक्रमाची चर्चा केवळ राज्यातच नाही, तर देशभरात पसरली होती. यंदा देखील या फेस्टचा योग्य वापर करत, स्वयंपूर्ण मित्रांच्या सहाय्याने दिव्यांगाविषयी असणाऱ्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाज आणि उत्तर गोव्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी कुमारी या मान्यवरांची उपस्थिती होती.

स्वयंपूर्ण मित्रांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. समाजामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दिव्यंगत्व ओळख पत्र (युडीआयडी कार्ड) मिळवून देण्यात मदत करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले आहे. दिव्यांगजनांना सक्षम करण्याबाबत सरकारचे खास धोरण आहे आणि या धोरणाच्या अनुषंगाने सदर कार्डच्या माध्यमातून दिव्यांगजनांना आवश्यक साधनांची उपलब्ध करण्यास सुलभ बनते. पर्पल फेस्ट हा स्वयंपूर्ण मित्रांसाठी चांगले व्यासपीठ ठरणार आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

विविध सरकारी योजनांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी, तसेच शासनाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधा यांची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्यांचे कौतुक आणि क्षमतांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात क्रांतिकारी पाऊल टाकणारी चळवळ म्हणून पर्पल फेस्टचे महत्त्व असल्याचे सांगितले. दि. ८ ते १३ जानेवारी या कालावधीत होणार्‍या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट–गोवा विषयी स्वयंपूर्ण मित्रांना माहिती देण्यासाठी पर्वरी येथील लेखा विभागामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दिव्यांगजांना क्षमता व कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा बद्दल स्वयंपूर्ण मित्रांना माहिती देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी बैठकीच्या प्रारंभी या बहुप्रतिक्षित उपक्रमामध्ये आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रम यांची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केली.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत