शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा गोव्यातही निषेध, अभाविप, शिवसेनेकडून निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 21:39 IST

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा गोव्यात अभाविप आणि शिवसेनेने निदर्शने करीत जोरदार निषेध केला.

पणजी : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा गोव्यात अभाविप आणि शिवसेनेने निदर्शने करीत जोरदार निषेध केला. अभाविपने येथील कदंब स्थानकावर निषेध सभा घेऊन जैश ए मोहम्मद संघटनेच्या अतिरेक्याचा पुतळा जाळला आणि शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी या प्रसंगी वक्त्यांनी केली.पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ सीआरपीएफ जवान शाहीद झाले. अभाविपचे विद्यार्थी नेते संकल्प फळदेसाई, अभिदीप देसाई, ऋषिकेश शेटगांवकर, सौरभ बोरकर, पूजन प्रिओळकर, प्रभा नाईक यांनी भाषणाद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी धावणारे नवज्योत सिद्धू तसेच फारुख अब्दुल्ला याचा निषेध करण्यात अभाविपने निषेध केला. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करुन दहशतवादाचे समूळ निर्मूलन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, शिवसेनेने शिवोली येथे निषेध सभा घेतली. मेणबत्ती मोर्चा काढून निषेध करण्यात आला तसेच आत्मघातकी दहशतवाद्याचा पुतळा जाळण्यात आला. या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा काळ आता आलेला आहे, असे शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले. आजकाल युवक पैशांच्या हव्यासापोटी दहशतवादाकडे वळतान की अन्य काही कारणांमुळे याची चौकशी केली जावी. भारतातील अशा युवकांना हाताशी धरुनच दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.