शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गरजेनुसार २४ तासांत सुविधा पुरवा, क्रीडा मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

By समीर नाईक | Updated: October 22, 2023 16:41 IST

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या बहुतांश पायाभूत सुविधांची पूर्तता झाली आहे.

पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच्या बहुतांश पायाभूत सुविधांची पूर्तता झाली आहे. आता अखेरच्या क्षणी लागणाऱ्या सोयीसुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आम्ही बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. क्रीडापटूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. 

गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा होईल. स्पर्धेतील बॅडमिंटनसह काही क्रीडा स्पर्धा आधीच सुरू झाल्या आहेत. आता स्पर्धेतील पुढील सामने ज्या - ज्या ठिकाणी होणार आहेत, तेथे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी भेट देऊन तयारीचा आढावा घेत आहेत. स्पर्धेच्या ठिकाणची तयारी कितपत झाली आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. जेथे वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत, तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री मंत्र्यांनी करून घेतली.

काही ठिकाणी तातडीने सुविधांची पुर्तता व्हावी यासाठी निर्णय घेण्याची गरज असल्याने मी व्यक्तिश: क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणांना भेटी देत आहे. सर्व अडचणी तत्काळ दूर करण्यात येत आहेत, सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत, असे गावडे म्हणाले.

स्पर्धेच्या तयारीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील लक्ष ठेवले आहे. राज्य सरकार २००९ पासून स्पर्धेच्या आयोजनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील होते. आणि आता ती वेळ आली आहे. आम्हाला अजून पुढे जायचे आहे.  ज्या-त्या स्थळांवर प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्यापूर्वी २४ तास आधी सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित प्रमुखांना देण्यात आले आहेत असेही गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा