शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वन्यप्राणी उपद्रवी जाहीर करण्याची सरकारची प्रक्रिया स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 19:04 IST

राज्यातील काही वन्यप्राणी हे उपद्रवी म्हणून जाहीर करण्याचा विचार सरकारने यापूर्वी केला व वन्यजीव मंडळाकडे त्याबाबतचा प्रस्तावही पोहचला तरी, आता मात्र सरकारने अशा प्रकारची प्रक्रिया पुढे न्यायची नाही असे तत्त्वत: ठरवले आहे. त्यामुळे वन खात्याने तूर्त हा विषय सोडून दिला आहे.

पणजी : राज्यातील काही वन्यप्राणी हे उपद्रवी म्हणून जाहीर करण्याचा विचार सरकारने यापूर्वी केला व वन्यजीव मंडळाकडे त्याबाबतचा प्रस्तावही पोहचला तरी, आता मात्र सरकारने अशा प्रकारची प्रक्रिया पुढे न्यायची नाही असे तत्त्वत: ठरवले आहे. त्यामुळे वन खात्याने तूर्त हा विषय सोडून दिला आहे.राज्यातील सत्तरी, डिचोली, सांगे, पेडणो, काणकोण अशा काही तालुक्यातील शेतक:यांनी काही वन्यप्राणी उपद्रवी म्हणून जाहीर करावेत अशी मागणी सरकारकडे गेल्या दीड वर्षात केली होती. विधानसभेत यापूर्वीचे विरोधी पक्षनेते तसेच विद्यमान काँग्रेस  आमदार प्रतापसिंग राणो यांनीही अनेकवेळा शेतीची नासधुस करणा:या काही वन्यप्राण्यांविषयी तक्रारी केल्या होत्या. रानडुक्कर, खेती, माकड असे प्राणी शेतक:यांच्या पिकाशी नाशाडी करत आहेत. मोर देखील कोणतेच पिक आम्हाला घेऊ देत नाहीत, असे काही शेतक:यांचे म्हणणो आहे. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर राज्यातील काही वन्यप्राणी उपद्रवी म्हणून जाहीर करावेत असा प्रस्ताव सरकारने वन्यजीव मंडळाकडे पाठवला होता. गेल्यावर्षी वन्यजीव मंडळाने हा विषय विचारात घेतला होता. काही प्राणी ठराविक मोसमांपुरते व ठराविक भागापुरते उपद्रवी ठरविण्याची एक पद्धत आहे. मात्र तत्पूर्वी नेमकी किती प्रमाणात कोणत्या मोसमात व कोणत्या भागात प्राण्यांकडून शेतीची किंवा एखाद्या पिकाची हानी केली जाते याचा अभ्यास करावा लागतो. केंद्र सरकारच्या यंत्रणांकडे त्याबाबतची व्यवस्थित माहिती ठेवावी लागते. उपद्रवी म्हणून प्राणी जाहीर केला की मग ठराविक भागांतच व ठराविक दिवसांत अशा प्राण्याला मारण्यास मुभा असते. महाराष्ट्र व अन्य काही राज्यांच्या मागण्या मान्य करून तिथे काही प्राणी हे उपद्रवी म्हणून केंद्राने यापूर्वीच जाहीर केलेले आहेत. सर्व राज्यांकडून केंद्राने माहिती मागितली होती.दरम्यान, उपद्रवी प्राणी म्हणून गोव्यातील प्राणी जाहीर करण्याचा विचार आता राज्य वन्यजीव मंडळाने सोडून दिला आहे. अलिकडेच गोवा राज्य वन्यजीव मंडळाची बैठक झाली व त्यावेळी अशा प्रकारचा विषय पुढे न्यायचा नाही, विषय स्थगित ठेवावा असे ठरल्याचे प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांनी सांगितले.