शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बीच शॅक वितरणाची प्रक्रिया वेळेवर पूर्ण होणार – पर्यटन मंत्री आजगांवकरांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 16:13 IST

गोव्यातील शॅक चालकांना २०८-१९ च्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वितरण प्रक्रिया वेगाने केली जाणार असल्याचे आश्वासन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यातील मंगलवारी दिले

पणजी - गोव्यातील शॅक चालकांना २०८-१९ च्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वितरण प्रक्रिया वेगाने केली जाणार असल्याचे आश्वासन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यातील मंगलवारी दिले आणि आवश्यक प्रक्रिया १५ सप्टेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या. आजगांवकर म्हणाले, ‘गेल्या हंगामाप्रमाणे २०१८- १९ मधील शॅक्स वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल, म्हणजे शॅक चालकांना त्यांचे युनिट स्थापन करून व्यवसाय सक्रिय करता येईल.’ गेल्या हंगामात राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर एकूण ३४५ शॅक्सचे वितरण करण्यात आले होते. उत्तर गोव्यात २५७ शॅक्सचे वितरण करण्यात आले होते, तर दक्षिण गोव्यात ८८ शॅक्स देण्यात आले होते. नव्या हंगामाची सुरुवात जवळ येऊन ठेपलेली असल्यामुळे व्यवसायात दिरंगाई होऊ नये यासाठी शॅक्स चालकांनी सरकारला शॅक वितरणाची प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे.

शॅक्स चालकांनी व्यक्त केलेल्या शंकेवर प्रक्रिया देताना आजगांवकर यांनी त्यांना दिलासा देत पर्यटन विभागाला नव्या हंगामासाठीच्या परवाना/वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या. २०१७-१८ च्या पर्यटन हंगामात शॅक वितरण प्रक्रिया आपण अशाचप्रकारे वेळेवर पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत पर्यटन मंत्र्यांनी याही वर्षी समान कार्यक्षमता अवलंबली जाईल याची खात्री दिली. आज प्रसारित केलेल्या निवेदनात आजगांवकर म्हणाले, ‘शॅक वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना मी पर्यटन विभागाला दिल्या आहेत.’शॅक वितरणाची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित  होणार असून शॅक चालक आवश्यक ती कागदपत्रे आणि औपचारिकता पूर्ण करतील, याची खात्री पर्यटन विभाग घेणार आहे, ज्यामुळे शॅकचे कामकाज सुरळीतपणे सुरू होईल.

 आजगांवकर यांनी गोव्यातील शॅक चालकांना शॅकचे वितरण झाल्यानंतर आवश्यक ते सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले तसेच पर्यटकांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, घन- कचऱ्याची विल्हेवाट आणि राज्यातील कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनnewsबातम्या