शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सोनशीच्या लढ्याचे पडसाद इतरत्रही, खाणग्रस्तांच्या तक्रारींचा ओघ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 22:52 IST

सोनशीवासीयांच्या धर्तीवर खाणींमुळे पीडित असलेल्या गावांनाही न्याय दिला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने आश्वस्त केल्यानंतर आता इतर खाण पीडित भागातील समस्यांचे डोंगर तक्रारी व गा-हाणीच्या स्वरूपात सरकारकडे येऊ लागल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी दिली.

पणजी: सोनशीवासीयांच्या धर्तीवर खाणींमुळे पीडित असलेल्या गावांनाही न्याय दिला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने आश्वस्त केल्यानंतर आता इतर खाण पीडित भागातील समस्यांचे डोंगर तक्रारी व गा-हाणीच्या स्वरूपात सरकारकडे येऊ लागल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी दिली. या प्रकरणांची तातडीने दखल घेण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे.अमर्याद खनिज उत्खनन आणि खनिज वाहतुकीमुळे ओरबाडला गेलेल्या सोनशी गावातील लोकांसाठी गोवा फाऊंडेशनने खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर खंडपीठाने या पीडितांना मोठा दिलासा मिळवून दिला. पिण्याच्या पाण्यालाही वंचित करण्यात आलेल्या या लोकांना ५ हजार लीटर क्षमतेच्या ५ टाक्या आणि ५०० लीटर क्षमतेच्या २० सिंटेक्स टाक्या पुरविण्याच्या तसेच इतर स्वरूपाची भरपाई देण्याचा आदेश दिला होता.खाण कंपन्यांकडून डिस्ट्रिक्ट मिनरल फंडात जमा होणाऱ्या निधीचाही पीडितांसाठी खर्च करण्याचा आदेश दिला होता. या फंडाची सविस्तर माहिती मागितली होती. तसेच मिनरल फंडच्या अधिका-यांना सोनशी गावात वारंवार भेटी देऊन त्यांच्या समस्यांची माहिती घेण्याचा आदेशही दिला होता. या आदेशाबरोबरच खाण उद्योगामुळे सोनशीच्या लोकांवर जे संकट कोसळले ते इतर ठिकाणीही खाणग्रस्त भागात कोसळले असण्याचीही शक्यता आहे. अशी अन्य प्रकरणे असल्यास तीही न्यायालयाच्या नजरेस आणावीत. त्या प्रकरणातही हाच न्याय लागू केला जाईल असे सांगितले होते. मिनरल फाउंडेशनलाच त्यांच्या तक्रारी घेऊन त्यांचे निवारण करण्याचा आदेश दिला होता. सोमवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा अशा तक्रारी येऊ लागल्याचे अ‍ॅड. लवंदे यांनी सांगितले. बहुतेक तक्रारी या खाणमाती वाहून आल्यामुळे शेती खराब झाल्याच्या तसेच बागायती खराब झाल्याच्या आहेत. या प्रकरणात २३ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा