शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान भेटीचा मुहूर्त सापडला, खाण अवलंबितांसोबत उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर गोव्यातील खनिज खाण अवलंबितांना भेट देण्यासाठी मुहूर्त सापडला. गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही पुढाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता भेटणार आहेत.

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर गोव्यातील खनिज खाण अवलंबितांना भेट देण्यासाठी मुहूर्त सापडला. गोव्यातील मंत्री, आमदार, खासदारांसोबत खनिज खाण अवलंबितांच्या काही पुढाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेनऊ वाजता भेटणार आहेत.

भाजपाचे तिन्ही खासदार तसेच भाजपाचे मंत्री निलेश काब्राल, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई, सभापती प्रमोद सावंत, मगोपचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर हे पंतप्रधानांशी होणा-या बैठकीवेळी उपस्थित असतील. खाण अवलंबितांच्या संघटनेचे प्रमुख पुती गावकर तसेच अन्य काही अवलंबितांसोबत पंतप्रधानांची चर्चा होईल. खनिज खाणी लवकर सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन खाण अवलंबितांनी गेले वर्षभर चळवळ चालवली आहे. खाण अवलंबितांचे नेते यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटले होते. 

अमित शहा यांनी खनिज खाणी सुरू होण्याबाबत केंद्र सरकार तोडगा काढील व पुढील आठ दिवसांत तुम्हाला त्याची कल्पना येईल असे गेल्या महिन्यात पुती गावकर व इतरांना सांगितले होते पण काहीच तोडगा न निघाल्याने खाण अवलंबितांनी दि. 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली. तसेच गोव्याचे तिन्ही खासदार झोपलेले आहेत, अशीही टीका गावकर यांनी केली होती. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाही यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर खाणप्रश्न मांडताच आला नव्हता, कारण मोदी भेटीसाठी वेळच देत नव्हते.

अमित शहा यांची येत्या 9 रोजी गोव्यात सभा होत आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी यांची भेट मिळायलाच हवी म्हणून प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व इतरांनी प्रयत्न केले. भेट निश्चित झाली असून मोदी नेमका कोणता उपाय सूचवतात ते ऐकण्याची उत्सुकता खाण अवलंबितांना आहे. कायदेशीर तोडगा काढण्याची ग्वाही यापूर्वी अमित शहा यांनी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 88 खनिज लिजेस बंद केल्यापासून खनिज खाणी बंद आहेत.

ढवळीकर अनुपस्थित मंत्री सुदिन ढवळीकर हे हैद्राबाद येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेले आहेत. त्यामुळे ते बैठकीला पोहचू शकणार नाहीत, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याला साडेतीन हजार कोटींची मदत केंद्राने करावी व एकदा खाणी सुरू झाल्यानंतर मग केंद्राने टप्प्याटप्प्याने ही रक्कम वसुल करून घ्यावी, कारण हे साडेतीन हजार कोटी रुपये खाण बंदीच्या काळात खनिज अवलंबितांना मदत करण्यासाठी वापरता येतील असा  मुद्दा यापूर्वी मंत्री ढवळीकर यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून मांडला आहे. या प्रस्तावाविषयी बुधवारी गोव्याचे खासदार, मंत्री, आमदारांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी केली.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदी