शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कूळप्रश्नी एल्गार!

By admin | Updated: May 8, 2015 01:10 IST

पणजी : कूळ कायद्यातील सनसेट कलम मागे घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढे आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या

पणजी : कूळ कायद्यातील सनसेट कलम मागे घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढे आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विचाराचे व भूमिकेचे विविध घटक स्वागत करत आहेत. मात्र, कूळ कायद्यातील सगळ्या दुरुस्त्या मागे घेतल्या जाव्यात म्हणून बहुजन महासंघाच्या छत्राखाली वेगवेगळ््या २४ समाजांतील लोक एकत्र आले आहेत. येत्या २४ रोजी कुंडई येथील तपोभूमीवर हे शक्तिप्रदर्शन होणार आहे.बहुजन समाजावर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून गोमंतक भंडारी समाजाने सुरू केलेल्या चळवळीला आता व्यापक रूप प्राप्त झाले आहे. भंडारी, खारवी, गावडा, कुणबी, वेळीप, पागी, कलईकार असे वेगवेगळे २४ समाज एकत्र आले आहेत. त्यातूनच बहुजन महासंघ स्थापन झाला आहे. गावागावांत समाजाच्या बैठका सुरू आहेत. येत्या २४ रोजी तपोभूमीवर सकाळी एक मोठा यज्ञ होईल व सायंकाळी तीन वाजता उद््घाटन सोहळा होणार आहे. हजारो समाज बांधव त्या वेळी उपस्थित राहतील. त्याची पूर्वतयारी प्रत्येक तालुक्यात सुरू असून बसगाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे महासंघावरील दोघा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ओबीसींसाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणात अगोदर १९.५ टक्के आरक्षण होते. ते २७ टक्के करावे म्हणून भंडारी समाजास आवाज उठवावा लागला. एसटी समाजातील अनेकांनी गावडा, कुणबी, वेळीप समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले. मात्र, त्या आंदोलनातील काही नेते व कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गंभीर असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आपला छळ थांबवावा व आपल्याविरुद्धचे खटले मागे घ्यावेत, अशी एसटी समाजातील कार्यकर्त्यांची मागणी आहे. बहुजन महासंघाने हाही विषय हाती घेतला आहे. दरम्यान, सनसेट कलम सरकारने कुळांऐवजी मामलेदारांना लावावे. कुळांनी तीन वर्षांत अर्ज करावेत, असे कलम लावण्याऐवजी मामलेदारांनी तीन वर्षांत खटले निकालात काढावेत, असे कलम सरकारने लागू करावे, असे मत बहुजन महासंघाचे सचिव उपेंद्र गावकर यांनी व्यक्त केले. (खास प्रतिनिधी)