शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती दोन दिवसांच्या गोवा भेटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:00 IST

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन दिवसांच्या  गोवा भेटीवर शनिवारी दुपारी आगमन झाले. गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सायंकाळी राष्ट्रपतींनी भाग घेतला. पोर्तुगीजांच्या राजवटीतून  गोवा मुक्त झाला, त्यास साठ वर्षे  होत आहेत. यापूर्वी कधीच गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देशाच्या कुठल्याच राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. कोविंद यांना ही संधी मिळाली. गोवा मुक्तीची साठ वर्षे वर्षभर साजरी करायची असे सरकारने ठरवले आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये यापुढे गोवा मुक्तीचे कार्यक्रम होतील. गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व पर्यटनाची परंपरा हे सगळे देशासमोर मांडावे असा सरकारचा ...

पणजी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दुपारी आगमन झाले. गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सायंकाळी राष्ट्रपतींनी भाग घेतला.

पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाला, त्यास साठ वर्षे  होत आहेत. यापूर्वी कधीच गोवा मुक्ती दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देशाच्या कुठल्याच राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. कोविंद यांना ही संधी मिळाली. गोवा मुक्तीची साठ वर्षे वर्षभर साजरी करायची असे सरकारने ठरवले आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये यापुढे गोवा मुक्तीचे कार्यक्रम होतील. गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व पर्यटनाची परंपरा हे सगळे देशासमोर मांडावे असा सरकारचा हेतू आहे.

राष्ट्रपती कोविंद हे त्यांच्या कुटूंबासह शनिवारी दाखल झाले, तेव्हा राज्यपाल कोशियारी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. दाबोळी विमानतळावर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो हेही उपस्थित राहिले. सायंकाळी राष्ट्रपतींनी गोवा मुक्तीच्या सोहळ्यात भाग घेतला. राष्ट्रपती रविवारीही गोव्यात असतील. त्यांचे काही खासगी कार्यक्रम रविवारी होतील. गोव्यातील विविध शिष्टमंडळेही राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सामाजिक प्रश्नांविषयी निवेदने सादर करणार आहेत. राष्ट्रपती कोविंद हे दक्षिण गोव्यातील एका मंदिरालाही रविवारी भेट देतील. राष्ट्रपतींची पत्नी, मुलगा व मुलगीही गोवा भेटीवर आली आहे.

सरकारने पणजी शहर सजविले असून सर्वत्र रोषणाई केली आहे. प्रथमच मांडवी किनारी असलेला रेईश मागूश हा ऐतिहासिक किल्लाही सुशोभित करून रोषणाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याला मुक्ती दिनानिमित्त शुभेच्या दिल्या.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदgoaगोवा