शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या जोडीने गोव्यात इफ्फीचाही माहोल तयार होण्यास आरंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:00 IST

गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. प्रतिनिधी नोंदणीला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे.

पणजी : गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. प्रतिनिधी नोंदणीला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे. ऐन दिवाळीच्या काळात गोव्यात इफ्फीचा माहोलही हळूहळू तयार होऊ लागला आहे. पूर्ण गोवा दिवाळी सणाच्या तयारीत मग्न असताना गोवा सरकारची मनोरंजन संस्था मात्र पूर्णपणे इफ्फीच्या तयारीत मग्न आहे.

गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू झाला असून पर्यटकांनाही भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेध लागले आहेत. इफ्फीला आरंभ होण्यास फक्त 35 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मनोरंजन संस्थेमध्ये धावपळ सुरू आहे. गेल्यावर्षी आठ हजार प्रतिनिधी इफ्फीत सहभागी झाले होते. यंदा संख्या वाढणे अपेक्षित आहे.

चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अधिकारीही इफ्फीच्या तयारीत गुंतले आहेत. शेकडो सिनेरसिकांनी गेल्या चार दिवसांत इफ्फीचे प्रतिनिधी म्हणून स्वत:ची नोंदणी करून घेण्यासाठी इफ्फीच्या आयोजकांकडे अर्ज केले आहेत. यात देशभरातील पत्रकारांचाही समावेश आहे. इफ्फीलाच जोडून फिल्म बाजारचे आयोजन केले जाईल. इफ्फीनिमित्ताने पणजीत सुशोभीकरण करणे, हाॅटेल खोल्यांचे आकर्षण तसेच वाहनांचे आरक्षण यासाठीची तयारी सुरू झाली आहे. 

पणजीपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये इफ्फीचा उदघाटन व समारोप सोहळा पार पडेल. दरवर्षीप्रमाणे आयनाॅक्स मल्टिप्लेक्स आणि कला अकामीमध्ये इफ्फीचे सारे चित्रपट दाखविले जातील. इफ्फीचे इवेन्ट मॅनेजमेंट, सुशोभीकरण व अन्य कामांसाठी यापूर्वी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

गोव्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. एकाबाजूने दिवाळी व दुसऱ्याबाजूने इफ्फीचा माहोल तयार होत असल्याचा अनुभव पर्यटकही घेत आहेत. बाजारपेठा दिवाळीनिमित्ताने फुलल्या आहेत. 

टॅग्स :goaगोवा