शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

इफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात, उद्घाटन सोहळा फक्त 9 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 11:27 IST

गोव्यात होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. सोहळ्याचं उदघाटन फक्त नऊ दिवसांवर येऊन ठेपले आहे. 

ठळक मुद्देगोव्यात होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. सोहळ्याचं उदघाटन फक्त नऊ दिवसांवर येऊन ठेपले आहे. 

पणजी - गोव्यात होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. सोहळ्याचं उदघाटन फक्त नऊ दिवसांवर येऊन ठेपले आहे. अभिनेता शाहरूख खानच्या उपस्थितीत इफ्फीचा उद्घाटन सोहळा होणार अशल्याती चर्चा सध्या आहे. त्याविषयी अंतिम निर्णय अजून झालेला नाही. एनएफडीसी आणि गोवा सरकारची मनोरंजन संस्था मिळून इफ्फीचे आयोजन करत आहे. दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे. इफ्फीसाठी जगभरातील सिनेमांची निवड सध्या केली जात आहे. येत्या चार-पाच दिवसांत त्याविषयी घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळाली. इफ्फीत गोमंतकीयांसाठी असलेल्या खास प्रिमीयर विभागात यंदा चार स्थानिक सिनेमांची निवड करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रीग्ज यांना गोवा मनोरंजन संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेष व इफ्फी फेस्टीव्हल एक्झीक्युटीव्हसाठी खास टि-शर्ट डिझाईन करण्याचे काम दिले गेले आहे. नवोदित चित्रपट दिग्दर्शकांसाठी यावेळी स्किल स्टुडिओ उभारला जाईल व तिथे सिनेमाविषयक विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. ही माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्याकडून मिळाली.

बायोस्कोप हे यावेळच्या इफ्फीचे एक वैशिष्ट्य असेल. पूर्वी इफ्फीस्थळीच पण बालोद्यानात जिथे किंगफिशर विलेज उभी केली जात असे, तिथे बायोस्कोर विलेज उभी केली जाईल. तिथे मुलांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे असतील व बालचित्रपट तिथे प्रदर्शित केली जातील. जे पालक व मुले इफ्फीचे प्रतिनिधी झालेले नाहीत, त्यांना हे सिनेमे पाहून इफ्फीचा फिल अनुभवता येईल. बायोस्कोप विलेजचे बॉलिवूडच्या कलाकारांकडून उदघाटन केले जाणार आहे.देश- विदेशातील मिळून सुमारे पाच हजार प्रतिनिधींची नोंदणी सध्या इफ्फीसाठी झालेली आहे. राजधानी पणजी सध्या इफ्फीच्या तयारीत व्यस्त आहे. शहर सजू लागले आहे. इफ्फीचे उद्घाटन आणि समारोप सोहळा बांबोळी-दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. इफ्फीस्थळी एक कट्टा उभारून तिथे बॉलिवूडच्या व मराठी चित्रपटाशीनिगडीत कलाकारांच्या मुलाखती आयोजित केल्या जातील. मनोरंजन संस्थेसमोर असलेल्या समुद्रकिनाऱ्यांकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार डॉ. सुबोध केरकर हे चित्रकृती उभ्या करणार आहेत. 

पणजीत सध्या रंगकाम, प्रमुख मार्ग स्वच्छ करणो, इफ्फीस्थळी डागडुजी करणो अशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 3क् रोजी इफ्फीचा समारोप होणार आहे. तथापि, सगळी यंत्रणा सध्या 2क् रोजी सायंकाळी होणार असलेल्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्य़ाच्या तयारीत गुंतली आहे. जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर असे काही कलाकार इफ्फीत सहभाग घेणार आहेत.

टॅग्स :goaगोवा