शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सावंत सरकारची वर्षपूर्ती अपयशाने भरलीय, सुदिन ढवळीकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 23:23 IST

अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत.

पणजी : प्रमोद सावंतसरकारची वर्षपूर्ती अपयशांनीच भरलेली आहे. प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापनाच्या स्तरावर विद्यमान सरकारला पूर्ण अपयश आले, अशी टीका मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी येथे केली.ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस कोटी रुपयांची कामे केली जातील, असे मनोहर पर्रिकर सरकार असताना जाहीर केले गेले होते. मात्र अजुनही विद्यमान सरकारने आमदारांना वीस पंचवीस कोटी रुपयांचा विकास निधी दिलेला नाही. अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अतिरिक्त कामांसाठी जे भूसंपादन व्हायला हवे होते, ते झाले नाही. सरकारकडे पैसेच नसल्याने कंत्रटदारांचीही बिले अडली आहेत.वाहतूक खाते महसुल वाढवू शकले नाही. केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यातही सरकारला अपयश आले. परिणामी वाहन अपघात वाढत आहेत. किनारे स्वच्छ ठेवण्यातही सरकारला अपयश आले आहे. कच:याची समस्या सरकार अनेक भागांत सोडवू शकले नाही. रस्त्यांवरील खड्डे लवकरच बुजविले जातील असे आम्हाला गेल्यावर्षी विधानसभेत सांगितले गेले होते. मी परवाच मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणो ते साखळी या रस्त्यावरून प्रवास केला. तिथे 28 मोठे खड्डे दिसले. कोरोनाविरोधी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले, तुम्ही सभा घेऊ नका असे लोकांना सांगता व मुख्यमंत्री व सरकारमधील मंत्रीच सभा, बैठका घेऊन स्वत:च्याच सूचनांचे उल्लंघन करत आहेत, असे ढवळीकर म्हणाले.म्हादईप्रश्नी पंतप्रधानांना पत्र दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळच दिल्लीला न्यायला हवे. आपण त्यासाठी पंतप्रधानांना कालच सविस्तर पत्र पाठवले आहे व सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीसाठी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जाईल. म्हादई पाणीप्रश्न नेमका काय आहे व त्याचे परिणाम गोव्याला कसे भोगावे लागतात हे मी पत्रत मांडले आहेच. कर्नाटकमधील सुपा धरणाची उंची वाढवा किंवा तिथे नवे धरण बांधा व त्याद्वारे हुबळी धारवाडला पाणी द्या, असे पत्रतून आपण सूचविले असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारPramod Sawantप्रमोद सावंत