शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनोत्तर पावसाने गोव्याला झोडपले, ६ तासात अडीच इंच

By वासुदेव.पागी | Updated: November 8, 2023 16:14 IST

पुढील २४ तासात परिस्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत. 

वासुदेव पागी, पणजी: अरबी समुद्रावर निर्माण झालेले चक्रीय वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र यामुळे बदललेल्या हवामानामुळे गोव्यासह कोंकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडला. गोव्यात सरासरी अडीच इंच पावसाची नोंद झाली तर पणजी, दाबोळी व मडगाव भागात २४ तासात ४ इंचाहून अधिक पाऊस पडला. पुढील २४ तासात परिस्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत. 

मान्सूनोत्तर पावसाने गोव्याला झोडपून काढले.  मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटेपर्यंत सरासरी ५.२ इंच पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली. हा पाऊस  ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाटासह कोसळला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या आणि पाणी तुंबल्याचेही वृत्त आहे. गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता समारोपाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. परंतु बुधवारच्या दिवसाच्या खेळावर या पावसाचा परिणाम झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. 

का पडला पाऊस

नैऋत्त्य मान्सून गोव्यासह संपूर्ण देशातून हटल्यानंतरही पाऊस पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी सध्या पडत असलेल्या पावसाच्या सरी या नैऋत्य मान्सूनच्या नाहीत. अरबी समुद्रावर निर्माण झालेले चक्रीय वारे आणखी सक्रीय झाले आहेत. तसेच त्या पुढची नवीन घटना म्हणजे चक्रीय वाऱ्याबरोबरच अरबी समुद्राच्या इशान्येकडील भागात कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण झाले आहे. यामुळेच गोव्यासह आजूबाजूच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडला. हे क्षेत्र पश्चीम दिशेला सरकत असल्यामुळे पाऊस हा हळू हळू कमी होणार आहे. त्यामुळे गुरूवारीही गोव्यात पावसाची शक्यता आहे. 

मान्सूनोत्तर पावसाचा विक्रम

मान्सूनोत्तर पावसाचे सामान्य प्रमाण हे गोव्यात ७ इंच इतके आहे. परंतु २४ तासात पडलेल्या जोरदार पावसामुळे गोव्यातील मान्सुनोत्तर पाऊस यंदा ८.३ इंच इतका झाला आहे. 

पाऊसम्हापसा-    २ इंचपेडणे :   १ इंचफोंडा १.४ इंचपमजी: ४ इंचजुने गोवे: २ इंचसाखळी: १.६ इंचकाणकोण: १ इंचदाबोळी: ४ इंचमडगाव: ४ इंचकेपे: २ इंचसांगे: २ इंच

टॅग्स :goaगोवाRainपाऊस