शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूनम पांडेचा आणखी गोड धक्का...होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 06:29 IST

 न्यायालयाच्या परवानगीने पती-पत्नी मुंबईला रवाना

 सुशांत कुंकळयेकर    लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : ऐन लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल उरकून लगेच गोव्यात दाखल होऊन आपल्या फॅन्सना एका पाठोपाठ धक्का देणारी वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिची आणखी एक गोड धक्का देणारी बाब पुढे आली आहे. गोव्याच्या वास्तव्यात पूनम चक्क सहा आठवड्यांची गर्भवती असून ती आता आई होणार आहे. तिला तपासणाऱ्या डॉक्टरनी तसे म्हटले आहे.दरम्यान, पूनम आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांनी आपल्याला मुंबईला जाण्यासाठी काणकोण न्यायालयाकडे मागितलेली परवानगी शुक्रवारी (दि. १३ )मान्य केली असून, शनिवारी (दि. १४)रात्री ते दोघे मुंबईला रवानाही झाले होते. काणकोण येथे `तो` वादग्रस्त पोर्न व्हिडिओ शूट केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्या दोघांना जामीन देताना काणकोण न्यायालयाने सहा दिवस काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची अट घातली होती. त्याचबरोबर गोवा सोडून राज्याबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घेण्याची अटही होती. त्या दरम्यान पूनमने वार्का येथील डॉ. आर. जी. प्रभुगावकर यांच्याकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी ती सहा आठवड्यांची गर्भवती असून, तिला विश्रांती घेण्याची गरज असल्याचा दाखला दिला होता.पूनमने आपल्या या अवस्थेचा दाखला देऊन तसेच सॅमने आपल्याला मुंबईत एक फिल्म आणि एक डॉक्युमेंटरी शूट करायची असल्याचे कारण सांगून परत मुंबईत जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. त्यानंतर न्या. शानुर अवदी यांनी अतिरिक्त हमीच्या अटीवर त्यांना गोवा सोडण्यास शुक्रवारी मंजुरी दिली.यावेळी पूनम व सॅमच्या वतीने बाजू मांडताना अँड. बायरन रॉड्रिग्स यांनी, त्या दोघांचे गोव्यात घर नसल्याने त्यांना हॉटेलात राहावे लागते, या गोष्टीकडे लक्ष वेधताना संचार स्वातंत्र्य हा कुणाचाही मूलभूत अधिकार आहे. कुणा व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला तरी त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणे शक्य नाही, असा दावा केला होता.पूनमला मिळालेला जामीन रद्द करावा यासाठी तक्रारदार सम्राट भगत यांनी दक्षिण गोव्यात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवल्याने पूनमवर आपली लग्नानंतरची पहिली दिवाळीगोव्यातच साजरी करण्याची वेळ आली होती. मात्र काणकोण न्यायालयाच्या परवानगीमुळे त्यांना दिवाळीच्या दिवशीच शेवटी घरी जाण्यास मिळाले. 

टॅग्स :Poonam Pandeyपूनम पांडे