शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात अकरा पालिकांसाठी २० मार्च रोजी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 11:43 IST

Goa : राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी ओएसडी आशूतोष आपटे, सहाय्यक संचालक सागर गुरव व इतरांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

पणजी : राज्यातील चौदापैकी अकरा नगरपालिका आणि पणजी महापालिका क्षेत्रात आज सकाळपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या २० मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल व २२ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. दि. २५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी ओएसडी आशूतोष आपटे, सहाय्यक संचालक सागर गुरव व इतरांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. वाळपई, पेडणे, म्हापसा, डिचोली, मडगाव, कुंकळ्ळी, सांगे, केपे, काणकोण, कुडचडे काकोडा आणि वास्को अशा अकरा नगरपालिकांसाठी निवडणूक होत आहे. या अकरा ठिकाणी एकूण २ लाख ५० हजार ४७० मतदार आहेत. पणजी महापालिका क्षेत्रात ३२ हजार ४१ मतदार आहेत.

साखळी पालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊसाठीही पोटनिवडणूक २० मार्चलाच होणार आहे. तसेच सासष्टीतील नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघातही २० रोजीच मतदान प्रक्रिया पार पडेल. आचारसंहिता ही पूर्ण राज्यात नसेल, जिथे निवडणूक होत आहे, तिथेच आचारसंहिता लागू झालेली आहे, असे आयुक्त गर्ग यांनी स्पष्ट केले. २१ निवडणूक अधिकारी व २२ सहाय्यक निवडणूक अधिकारी आयोगाने नियुक्त केले आहेत. शिवाय २४ खर्च विषयक निरीक्षक नेमण्यात आले आहेत. ते उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतील. 

कोविडग्रस्तांसाठी एक तास राज्यात सध्या कोविडचे रुग्ण पाचशेहूनही कमी आहेत. त्यांना मतदान करण्याचा हक्क बजाविता यावा म्हणून सायंकाळी चार ते पाच हा शेवटचा तास राखून ठेवला गेला आहे. या एक तासात ते मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकतील, असे गर्ग यांनी सांगितले. निवडणुकीवेळी सर्व उमेदवारांसह मतदार व अन्य सर्वांनीच कोविडविषयक प्रक्रिया व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन गर्ग यांनी केले. न्यायालयात आरक्षणाविरुद्ध याचिका असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, न्यायालय काय तो निर्णय घेईल, आपण त्यावर बोलू शकत नाही असे गर्ग म्हणाले.

निवडणुकीचा कार्यक्रम-२५ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारणार- अर्ज स्वीकारण्यास अंतिम मुदत ४ मार्च (रविवार वगळून)- अर्जांची छाननी ५ मार्च रोजी- अर्ज मागे घेण्यास मुदत ६ मार्च रोजी- मतदान २० रोजी- मतमोजणी व निकाल २२ मार्च रोजी- पणजी महापालिका क्षेत्रात ३२ हजार ४१ मतदार- अकरा पालिका क्षेत्रांत २ लाख ५० हजार ४७० मतदार

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक