शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

दाबोळी विमानतळावरून नाहक ओरड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2024 10:26 IST

आता काही विमान कंपन्यांनी मोपाचाच विमानतळ वाहतुकीसाठी निवडला असेल, तर त्यावरून थयथयाट करायची गरज नसावी.

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

दाबोळी विमानतळावरून विरोधकांचा सध्या सुरू असलेला थयथयाट पाहाता कोणाही त्रयस्थाला वाटावे की या विमानतळाला आता कधीही टाळे लागेल. वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. मोपा येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दाबोळीवरचा ताण बराच कमी झाला आहे. तो पाहता ते घडणे अपेक्षितच होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना चघळायला एखादा दुसरा मुद्दा हवाय है मान्य असले तरी दाबोळी विमानतळावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणा वा गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आदी नेते सध्या बेताल होऊन जे बरळत आहेत ते मुद्दयाला धरून आहे, असे वाटत नाही.

अलीकडेच वास्को येथे स्थानिक आमदाराने द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दाबोळीचे आमदार आणि मंत्री माविन गुदिनो आदिंनी दाबोळी विमानतळ कायमचा बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचा सातत्याने जो आरोप होत आहे, तो खोडून काढताना हा विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नसल्याचा पुनरुच्चार करून गोवा लहान असला तरी दोन विमानतळांची गरज आहे, असे निःसंदिग्धपणे जाहीर केले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनीही याआधी याबाबत केंद्राची भूमिका स्पष्ट केली असतानाही काही ना काही निमित्ताने विरोधक या आरोपांचा पुनरुच्चार करत वेगळेच चित्र लोकांपुढे ठेवण्याचा प्रयन करताना दिसतात.

दाबोळीचा विमानतळ बंद करण्याच्या हालचाली राज्य आणि केंद्रीय स्तरावर सुरू आहेत, हा जो आरोप मागील पाच-सहा महिन्यांपासून विरोधक करत आहेत त्यास नेमका कोणता आधार आहे हे कळायला मार्ग नाही. राज्य विधानसभेतही एक दोनवेळा हा विषय चर्चेला आला आणि सरकारची भूमिकाही स्पष्टपणे समोर आली. आता अजून एक दोन विमान कंपन्यांनी आपला मोर्चा मोपाच्या नव्या विमानतळाकडे वळवला असेलही.

गोव्यासाठी पूर्ण स्वतंत्र आणि भव्य असा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिल्यानंतर या गोष्टी घडून येणे अपेक्षित आहेच, पण त्याच आधारावर ओरड करण्याएवढी परिस्थिती हाताबाहेर गेली का हाच खरा प्रश्न आहे आणि वस्तुस्थिती तपासून पाहिल्यास तसे वाटतही नाही. आजच्या परिस्थितीत सरकारलाही दाबोळी विमानतळ बंद करण्याचा विचारही मनात आणता येणार नाही. त्यामागे अनेक कारणेही आहेत पण नजीकच्या काळात दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीस बंद होण्याच्या ज्या भीतीने विरोधकांना पछाडले आहे, ती भीती अनाठायी म्हणता येईल. आजही या विमानतळावर उतरणा-या प्रवाशांची संख्या आधीच्या तुलनेत अगदीच कमी झाली आहे असे म्हणण्यासारखी निश्चितच नाही, तरीही विरोधक त्याचा एवढा बाऊ का करतात हे कळत नाही.

स्पायजेट कंपनीनेही आता आपली सर्व वाहतूक मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक बिथरले असावेत हे समजू शकते. पण दाबोळीचा विमानतळ बंद करण्याच्या विरोधात गोवा उभा ठाकला आहे याचीही दखल येथील डबल इंजिन सरकारला घ्यावीच लागणार आहे. दाबोळी विमानतळावरून होणारी वाहतूक जवळपास थांबली असल्याचा जो दावा केला जातो तो मात्र खरा नाही. आजही दाबोळी विमानतळावर दर दिवशी साधारणपणे ५५ ते ५६ विमाने उतरतात आणि आठेक हजार प्रवासी गोव्यात दाखल होतात. या विमानतळावरून रोज वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाण करत असलेल्या प्रवाशांची संख्या नऊ हजारांवर जात असल्याचे सांगितले जाते आणि हे जर खरे असेल तर दाबोळी विमानतळाकडे सरकारचा सवतासुभा असल्याचे कोणत्या निकषावर म्हणता येईल? 

मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दर दिवशी उतरणा-या विमानांची संख्या ४५ ४६ च्या पुढे जात नाही आणि दाबोळी विमानतळाच्या तुलनेत या विमानतळावर उतरणा-या आणि येथून उड्डाण करणा-या प्रवाशांची संख्याही अजून एवढी वाढलेली नाही की कोणी त्याचा धसका घ्यावा. प्रत्येक विमानामागे सरासरी दोनशे प्रवासी धरले तरी दाबोळी आणि मोपा विमानतळावर प्रवाशांची होणारी वर्दळ जवळपास समान असताना विरोधक नेमके कशाच्या आधारावर दाबोळी विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण करतात, हेही त्यांनी एकदाचे सांगायला हवे.

मोपाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा साधारण तीन हजार कोटींचा असून अजून दुस-या टप्प्याचे काम व्हायचे असले तरी या विमानतळावरूनही वाहतूक सुरू होऊन तो मार्गी लागायला हवा, याबाबत कोणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही. आता काही विमान कंपन्यांनी मोपाचाच विमानतळ वाहतुकीसाठी निवडला तर त्यावरून थयथयाट करायची गरज नसावी. दाबोळीवरून इंडिगो, विस्तारा, एअर इंडियाची प्रवासी वाहतूक सुरूच असून आंतरराष्ट्रीय मार्गावरही कटार एअरवेज, गल्फवेज आणि एअर इंडिया यांची सेवा येथून चालू असताना सगळीच विमानवाहतूक जणू काही मोपावरूनच होऊ लागल्याचा जो आभास केला जातो तो मात्र चुकीचा आहे.

मोपा विमानतळ सुरू होण्याआधीचा विचार केल्यास दाबोळी विमानतळावरून दररोज सुमारे ८० ते १० विमाने उतरायची आणि रविवारी कदाचित ही संख्या १०० वरही जायची. प्रवाशांची संख्या आताच्या तुलनेत दीडपट होती, याचाच अर्थ असा काढता येईल की दाबोळी विमानतळावरची वाहतूक आजही ब-यापैकी सुरू आहे. दाबोळी विमानतळ बंद करायचाच असता तर आज हे चित्र दिसले नसते असे त्याहीपुढे जाऊन म्हणता येईल. दाबोळी विमानतळ दक्षिण गोव्यासाठी खूप महत्त्वाचा असून आजही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी दाबोळीलाच प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारला हा विमानतळ बंद करणे परवडणारे नाही याचेही भान ठेवण्याची गरज आहे. नाहक ओरड केल्याने काहीही साध्य होणार नाही.

 

टॅग्स :goaगोवा