शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा - जोशुआ डिसोझा

By काशिराम म्हांबरे | Updated: October 10, 2023 16:49 IST

आपण आपल्या जिवनात शरिरासोबत इतरही चाचण्या वेळोवेळी करुन घेतो पण मानसिक चाचणी कधीच करुन घेत नसतो.

 

म्हापसा: राजकारणात राहून लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा करणाºया राजकारण्यांनी लोकांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी केले आहे.आपण राजकारणात येण्यापूर्वी आपल्या आईने आपल्याला मानसोपचाराला भेटण्याचा सल्ला दिला. आपण मानसिकरित्या व्यवस्थीत असूनही आईच्या सल्ल्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाला भेटलो. त्यानंतर पुढील किमान ४ महिने आठवड्यातून  एकदा भेटत गेलो. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा आपल्याला जिवनात तसेच राजकारणात बराच लाभ झाला. लोकांशी संवाद साधण्यास, त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या समजून घेण्याचा लोकांसमोर न डगमगता बोलण्याचा लाभ यातून आपल्याला झाल्याचे डिसोझा म्हणाले.येथील जुन्या आझिलो रुग्णालयात काल १० आॅक्टोबर रोजी ते मानसिक स्वास्थ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक विभागाच्या वतिने त्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, डॉ. राजेश धुमे, डॉ. शाहिन सय्यद, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.राजकारण्यांना दर दिवशी शेकडो लोक त्यांच्या समस्या घेऊन भेटायला येतात. त्यामुळ्े येणाºया प्रत्येक नागरिकाचे मानसिक स्वास्थ्य पाहून त्यानुसार त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे असते. अशावेळी राजकारण्यांच मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. ते बिघडले तर परिणाम होऊ शकतात. अशावेळी मानसोपचाराचा बराच लाभ होत असतो असेही डिसोझा म्हणाले.आपण आपल्या जिवनात शरिरासोबत इतरही चाचण्या वेळोवेळी करुन घेतो पण मानसिक चाचणी कधीच करुन घेत नसतात. आपण झोपलो तरी मन चालूच असते. अशावेळी मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी सल्ला घ्यावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला डॉ. तन्वी पेडणेकर  यांनी कशा प्रकारे मानसिक रुग्णांनी आपली काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. डॉ. राजेश धुमे यांनीही आपले विचार मांडले.