शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी - पोलीस मटका जुगारात नाहीत,  गोवा क्राईम ब्रँचचे न्यायालयात निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:46 IST

गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसार माद्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही  असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे. 

पणजी: गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसारमाध्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे. मटका जुगार प्रकरणात  तपास करणा-या क्राइम ब्रँचने खंडपीठात मंगळवारी तपासाचा अहवाल सादर केला. त्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा उल्लेख आहे तसेच टाकण्यात आलेल्या छाप्यांचीही माहिती आहे. विशेष म्हणजे मटका जुगारात कोणत्याही प्रसार माध्यमांचा, पोलिसांचा आणि राजकीय व्यक्तींचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी एक किरण म्हणून राजकारण्याचा उल्लेख केला होता.  परंतु कुणा राजकारण्याचे संबंध असल्याचे पुरावे सापडले नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी खंडपीठात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रात गोव्यात संघटीत मटका लॉबी वगैर नसल्याचे म्हटले आहे.  आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १५४६ छापे टाकण्यात आले आणि त्यात १६१७ जणांना अटक करण्यात आली तर १५.१७ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर मटका लॉबी ही संघटीत नसेल तर हे अटक करण्यात आलेले संशयित स्वत:च मटका चालवित होते काय असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान गोव्याचे विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात मटका जुगाराच्या चिठ्ठ्या मिळाल्याची  आणि त्यानंतर त्यांची करण्यात आलेल्या चौकशीची माहितीही क्राईम ब्रँचकडून खंडपीठाला देण्यात आली आहे.  मटका जुगारावर कारवाई करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए पी लवंदे यांच्या देखरेखेखाली विशेष  तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात एक अधीक्षक व उपअधीक्षक आणि दोन निरीक्षकांचा समावेश आहे.

टॅग्स :Courtन्यायालय