शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोडा येथे सहा दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

By आप्पा बुवा | Updated: June 15, 2023 18:01 IST

सहा दिवसांपूर्वी शिरोडा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चोराना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले.

फोंडा - सहा दिवसांपूर्वी शिरोडा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चोराना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले असून, त्यांनी चोरलेले नऊ लाखाचे दागिने व रोख वीस हजार सुद्धा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सविस्तर पुरतानुसार 9 जून रोजी पाजीमळ शिरोडा येथील रसिका प्रशांत पैगिंटकर यांनी आपल्या घरात चोरी झाल्या संबंधित तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी  साडेदहा ते रात्री साडेबाराच्या दरम्यान घरात कोणी नाही ते पाहून चोरट्यानी दरवाजा फोडून आत प्रवेश केला.

रसिका यांच्या शेजारणीने काही दिवसापूर्वीच आपले दागिने ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दिले होते. सदरच्या नऊ लाखाच्या दागिण्यावर चोरट्यानी डल्ला मारला. त्याच बरोबर घरात असलेले वीस हजाराची रोख घेऊन त्यांनी पोबारा केला होता. परिसरात असलेल्या तांत्रिक गोष्टीच्या आधारे पोलिसांनी यासंबंधी तपास सुरू केला होता.  काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी त्या भागात एक अज्ञात जोडपे पांढऱ्या दुचाकी वरून परिसरात फिरत होते. पोलिसांनी सुरुवातीला त्या गाडीचा छडा लावायचे ठरवले .तपास चालू असताना सदरची गाडी मडगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस अगोदर गाडी व  नंतर त्या गाडीच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहोचले. पोलीसांनी हिसका दाखवताच दोन्ही चोरट्यानी आपला गुन्हा लगेचच कबूल केला.

सदर घरफोडी प्रकरणी गॅबी पावलू फर्नांडिस (वय 25, राहणार सावर्डे), शबनम रियाज अहमद सय्यद( राहणार नावेली, वय 24) या दोघांना पोलिसांनी लगेचच संशयित म्हणून ताब्यात घेतले.

 पोलीस स्थानकात आल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानी मोहम्मद कासिम उर्फ दीपक याचे सुद्धा नाव घेतले. त्याचा सहभाग सदर चोरीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतले आहे .चोरलेले नऊ लाखाचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, आदित्य नाईक गावकर, यांच्याबरोबर पोलीस केदार जल्मी, अमेय गोसावी, आदित्य नाईक यांनी या संदर्भात चांगली कामगिरी बजावली. फोंडा स्थानकाचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सदर सदरच्या चोरीप्रकरणी  तपास यंत्रणेला योग्य ते मार्गदर्शन केल्याने सदर गुन्ह्याचा छडा लागू शकला.