शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मेरशी हल्ल्यामागे पोलीस निष्क्रियता

By admin | Updated: June 16, 2017 02:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा गुंडगिरी हाच व्यवसाय असून चौथा हल्लीच त्यांच्या चमूत सामील झाला आहे. हे लोक कुणाचा तरी घात केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी या भागात चर्चा आहे; परंतु दहशतीमुळे उघडपणे बोलण्यास कुणीही धजत नाही. मुंबईतील पर्यटकांपैकी एका प्रौढ गृहस्थाचा हात चुकून लॉरेन्स डायस याला लागला. तेव्हा ‘तू मला हात लावलासच कसा?’ असे म्हणत त्या प्रौढ गृहस्थाच्या थोबाडीत लगावून भांडण करणारा लॉरेन्स हाच या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. बिचाऱ्या त्या पर्यटकाने मार खाऊन देखील हे प्रकरण हॉटेलमध्येच मिटविण्यासाठी लॉरेन्ससमोर हातही जोडले होते. मात्र, लॉरेन्स काहीच न बोलता शांत राहिला, त्यामुळे हे प्रकरण मिटले समजून पर्यटक निघून गेले. परंतु ते पर्यटक निघताच लॉरेन्सने तिथूनच आपल्या साथीदारांना फोन केला व त्या पर्यटकांवर सशस्त्र हल्ला चढविण्याचा बेत आखला आणि तो अमलातही आणला. सीसीटीव्ही फोडण्याची धमकीज्या हॉटेलमध्ये मुंबईतील पर्यटक चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्या हॉटेलमध्ये लॉरेन्स याने केलेला सर्व हंगामा तेथील सीसीटीव्हीत टिपला गेला आहे. भांडणानंतर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यासाठी लॉरेन्सकडून हॉटेलवाल्यांना सुनावले होते. ते फुटेज पोलिसांकडे पोहोचल्यास सीसीटीव्हीसह हॉटेलही फोडून टाकू, अशी धमकीही तो देऊन गेला होता. एक माणूस भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी येतो आणि धमकी देऊन जातो असे प्रकार बऱ्याच काळानंतर गोव्यात पुन्हा सुरू झाले आहेत. गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी आलेले वसईतील हे पर्यटक एकाच परिवारातील होते. ते अत्यंत सभ्य, प्रामाणिक आणि भले माणूस होते, असे ज्या ठिकाणी हे पर्यटक थांबले होते त्या गेस्ट हाऊसच्या मालक मारिया आणि ज्या हॉटेलमध्ये ते नाश्ता घेण्यासाठी गेले होते तेथील कर्मचारीही सांगतात. गोव्यातील माणसे फार चांगली आहेत. पुन्हा गोव्यात येण्यासाठी फार आवडेल, असे सांगून ही मंडळी परतीच्या वाटेला निघाली होती; परंतु त्यानंतर जे काही घडले त्यामुळे उभ्या जन्मात पुन्हा गोव्यात येण्याचे धाडस ते करणार नाहीत. तसा संदेशही त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे.