शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुटसारख्या गजबजलेल्या परिसरात गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 19:00 IST

म्हापसा : कळंगुटसारख्या गजबजलेल्या तसेच लोकांची सततची वर्दळ सुरू असलेल्या सुप्रसिद्ध अशा किनारी भागात एका बंगल्याच्या आड गांजा शेतीच्या लागवडीवर कारवाई करून अंदाजीत १० लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे.

म्हापसा : कळंगुटसारख्या गजबजलेल्या तसेच लोकांची सततची वर्दळ सुरू असलेल्या सुप्रसिद्ध अशा किनारी भागात एका बंगल्याच्या आड गांजा शेतीच्या लागवडीवर कारवाई करून अंदाजीत १० लाख रुपये किमतीचा गांजा ताब्यात घेतला आहे. तसेच गांजाची केलेली शेती सुद्धा नष्ट केली आहे. गजबजलेल्या परिसरात गांजाच्या लागवडीवर केलेली ही या भागातील मागील काही वर्षापासूनची पहिल्याच कारवाई आहे.कळंगुटजवळ असलेल्या कांदोळी पंचायत क्षेत्रातील आराडी या भागात कळंगुट पोलिसांनी सदर कारवाई केली. निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कांदोळी येथील आराडी भागात एका बंगल्याच्या आवारात बेकायदेशीरपणे गांजाच्या शेतीची लागवड सुरू असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली.तयार केलेल्या पथकाने घटनास्थळाची जाऊन पाहणी केली असता तयार करण्यात आलेल्या या गांजाच्या शेतीची देखभाल करणा-या तसेच त्यात काम करणारे दोन कामगार त्यांना आढळून आले. सुसांता साहू (२६) तसेच प्रवश समाल (२०) या कामगारांना नंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी अंती त्यांनी गांजाची शेतीची लागवड करीत असल्याचे मान्य केले. लागलीच त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.लागवड सुरू असलेल्या शेतीतील गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे लहान लहान तुकडे करून ती नष्ट करण्यात आल्याची माहिती दळवी यांनी दिली. सदर शेतीचा परिसर प्लायवूडने पूर्णपणे झाकून टाकण्यात आला होता. त्यामुळे बाहेरून उघड्या डोळ्यांनी आत काय चालू हे कळणे मुश्कील होते, असेही निरीक्षक म्हणाले. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर बंगल्याची झडती घेतली असता त्यातील एका भागात हुक्के पोलिसांना सापडले. त्यावरून लागवड केलेल्या गांजाचा वापरही त्यात परिसरात करण्यात येत असल्याची शक्यता निरीक्षकांनी नाकारली नाही. चौकशी अंती सर्व स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.सदर परिसर लॅनी फियेलो यांच्या मालकीचा असून त्यांनीच या शेतीची लागवड केली असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या त्या दोन्ही कामगारांनी चौकशी दरम्यान पोलिसांना दिली. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत फियेलो विरोधात पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. त्याला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. नष्ट करण्यात आलेल्या गांजा सुमारे १० किलो वजनाचा असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे १० लाख रुपयांची होत असल्याचे दळवी म्हणाले.अधीक्षक चंदन चौधरी यांच्या देखरेखीखाली तसेच उपअधीक्षक नेल्सन अल्बुकेर्क व निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहे. कारवाईत त्यांच्यासोबत हवालदार योगेश बोर्डेकर, गणपत तिळोजी तसेच ब्रह्मानंद पोळजी यांनी भाग घेतला.