शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय? सरकारकडून कायदा दुरुस्तीचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:20 IST

गोव्यातील काही स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय चालतो, अशा प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सरकारच्या आरोग्य खात्याने आता स्पांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार पक्का केला आहे. येत्या आठवडय़ात वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, महिला आयोगाच्या चेअरमन आदींची मिळून एक समिती नेमायची असे सरकारने ठरवले आहे.

पणजी : गोव्यातील काही स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय चालतो, अशा प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सरकारच्या आरोग्य खात्याने आता स्पांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार पक्का केला आहे. येत्या आठवडय़ात वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, महिला आयोगाच्या चेअरमन आदींची मिळून एक समिती नेमायची असे सरकारने ठरवले आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य कायदा दुरुस्त करून स्पांविरुद्ध काही कडक तरतुदी करण्याचेही ठरले आहे.गोव्यात गेल्या वीस वर्षात पर्यटन व्यवसायाचा विस्तार जसजसा होऊ लागला, तसतसे शेकडो स्पा गोव्यात सुरू झाले. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा , वागातोर, हरमल, हणजुण येथे तर सर्वाधिक स्पा आढळतात. या शिवाय पर्वरी, साळगाव, पणजी, कांपाल, करंजाळे, मिरामार, दोनापावल, बांबोळी या पट्टय़ातही गेल्या पाच वर्षात अनेक स्पा सुरू झाले. दक्षिण गोव्यातील काणकोण, सासष्टी या तालुक्याच्या किनारी भागातही शेकडो स्पा दिसून येतात. गोव्याती बहुतांश तारांकित हॉटेलातही स्पा आहेत. या स्पांमध्ये पर्यटक आणि स्थानिकही जातात.गोव्यातील स्पा मध्ये काम करणा:या अनेक मुली ह्या नेपाळी, आसाम वगैरे भागातील असतात. 9क् टक्के मनुष्यबळ हे परप्रांतीयच असते. गेल्या दोन वर्षात तर कळंगुट, हणजुणो, पर्वरी, पणजी आदी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील काही स्पांवर पोलिसांनी छापे टाकले. शरीर विक्रीचा धंदा ज्या स्पांमधून चालतो, अशा ठिकाणी कारवाई करण्यात आली. काहीजणांना अटक झाली तर काही मुलींची सुटका झाली. काही प्रकरणी पोलिसांची कारवाई देखील संशयाचा विषय ठरली. दरम्यान, आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणो यांनी अवघ्येच स्पा गैरधंद्यांमध्ये असतील, सगळे नव्हे असा मुद्दा येथे पत्रकार परिषदेत बोलताना मांडला. दोनापावल येथील स्पाविरुद्ध तक्रारी येत आहेत, असे ते म्हणाले. आम्हाला स्पा चालविणा:या व्यवसायिकांचा छळ करायचा नाही पण वेश्या व्यवसायासाठी स्पांचा वापर करणा:यांचा परवाना रद्द केला जाईल. तत्पूर्वी कारवाई एकतर्फी ठरू नये म्हणून आपण एक उच्चस्तरीय समिती नेमेन. पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि इतरांचा सहभाग ह्या समितीमध्ये असेल. या समितीकडून स्पांची पाहणी केली जाईल. सार्वजनिक आरोग्य कायदाही दुरुस्त करून काही नव्या तरतुदी केल्या जातील. सर्वच स्पांना आम्ही दोष देत नाही, असे मंत्री राणो म्हणाले.