शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पेट्रोल महागले, वाहनांसाठी प्रवेश कर रद्द

By admin | Updated: March 24, 2017 18:49 IST

राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर १५ टक्क्यांनी वाढवणारा, जीएसटी लागू होताच वाहनांसाठी असलेला प्रवेश कर रद्द करण्याची ग्वाही

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 24  : राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर १५ टक्क्यांनी वाढवणारा, जीएसटी लागू होताच वाहनांसाठी असलेला प्रवेश कर रद्द करण्याची ग्वाही देणारा, गोवा हे देशातील पहिले भिकारीमुक्त राज्य करणारा तसेच कचरामुक्त राज्याची हमी देणारा २०१७-१८ या सालासाठीचा २०२.४८ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. एकूण १६ हजार २७ कोटी रुपये आकाराचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकार ९.०७ टक्क्यांनी जास्त आहे.गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचा आकार १४ हजार ६९४ कोटी होता. एकूण १० हजार ८७२ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न आणि १० हजार ६७० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे. केंद्रीय निधीत तीनपट वाढ झाली आहे. केंद्रीय करातील गोव्याचा वाटा ३,२२४.६१ कोटी आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण २२.४ टक्के आहे. मुख्यमंत्र्यांनी सुमारे पावणे दोन तास अर्थसंकल्पीय भाषण केले.

पेट्रोलचा दर ६५ रुपयांपर्यंतकर्नाटक आणि महाराष्ट्रात पेट्रोलचा दर अनुक्रमे ७२ व ७६ रुपये प्रतिलिटर आहे. गोव्यात आता पेट्रोल साधारणत: ६१ रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोलवरील व्हॅट १५ टक्क्यांनी वाढविल्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ६५ रुपये होणार आहे. येत्या दि. १ एप्रिलपासून ही वाढ लागू होईल. त्यामुळे सरकारला ५० ते ६० कोटींचा महसूल मिळेल. २०१२ साली भाजप सरकार अधिकारावर आले होते, तेव्हा पहिल्याच घोषणेत पेट्रोलचे दर कमी करण्यात आले होते. 

बियरवरील करात वाढ बियरवरील अबकारी करात वाढ करण्यात आली आहे. मात्र, बल्क लिटरमागे ५० पैसे या दराने निर्यात शुल्क कमी करण्यात आले आहे. मळी ठेवणे व विक्री करणे यासाठी २५ हजार रुपयांचे परवाना शुल्क लागू करण्यात आले आहे.

‘रेन्ट अ बाईक’ला मुभा रेन्ट अ बाईक तथा दुचाकी-टॅक्सीच्या नव्या नोंदणीवर बंदी होती. ती मागे घेण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केली. इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोटरवाहन कर माफ करण्यात आला आहे. १५ वर्षे झालेल्या जुन्या चारचाकी गाडीची नोंदणी जर कुणी रद्द केली व त्याऐवजी नवी कारगाडी घेतली तर रस्ता कर भरावा लागणार नाही.