शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पेट्रोल 1 रुपये 12 पैशांनी महागले, नवा दर 64 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 18:45 IST

गोवा सरकारच्या अर्थ खात्याने मंगळवारी अधिसूचना जारी केली आणि पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (वॅट) 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवला.

पणजी : गोवा सरकारच्या अर्थ खात्याने मंगळवारी अधिसूचना जारी केली आणि पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (वॅट) 13 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवला. यामुळे पेट्रोल मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रति लिटरमागे 1 रुपये 12 पैशांनी महागले. यामुळे सरकारच्या तिजोरीत दरमहा सुमारे तीन कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे.वाणिज्य खात्याच्या अधिका-यांनी लोकमतला सांगितले की, पेट्रोलचा दर प्रति लिटर 62.87 रुपये होता. त्यावर दोन टक्के मूल्यवर्धित कर वाढविल्याने वार्षिक सुमारे 35 ते 36 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. अलिकडे पेट्रोलचा दर कमी झाला होता. पेट्रोल हे गोव्यात डिझेलपेक्षा स्वस्त होते.वॅट वाढविण्याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याच्या अव्वल सचिव सुषमा कामत यांच्या सहीने जारी झाली आहे. बियर आणि भारतीय बनावटीच्या विदेशी दारूसाठीही मूल्यवर्धित कर निश्चित करण्यात आला आहे, पण त्यांचे दर वाढलेले नाहीत. स्वयंपाक गॅसवरील वॅट 4 टक्के आहे. विदेशी दारू व बियरवर 22 टक्के मूल्यवर्धित कर आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवरही 22 टक्के वॅट आहे हेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात अजूनही पेट्रोल स्वस्तच आहे. शेजारील कर्नाटक व महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल व डिझेलचे दर कायम स्वस्त राहिले आहेत. 2012 साली मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अधिकारावर आल्यानंतर सर्वप्रथम गोव्यात पेट्रोलवरील वॅट जवळजवळ काढून टाकला गेला होता व त्यामुळे गोव्यात पेट्रोल लिटरमागे सोळा रुपयांनी स्वस्त झाले होते. पूर्ण देशात तेव्हा गोव्याचे कौतुक झाले. पाच वर्षांनंतर मात्र गोव्यात पेट्रोल व डिझेलचा दर वाढत गेला.