पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा इफ्फीस्थळी आयोजक आणि पोलिसांकडून छळवाद चालल्याचा आरोप येथे रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटांना वाव मिळावा यासाठी मंगळवार, दि. २४ आणि बुधवार, दि. २५ असा दोन दिवसांचा समांतर चित्रपट महोत्सव येथे भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट या इफ्फीत डावललेले आहेत, असे पुणे येथील या संस्थेचा विद्यार्थी प्रतीक वत्स याने माध्यमांना सांगितले. इफ्फीस्थळी आम्हाला कायम नजरकैदेत ठेवले जात आहे. केवळ संस्थेचे टी शर्ट घातले म्हणून अटक करणे, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल फोनमधील वैयक्तिक माहिती तपासली जात आहे, हा छळणुकीचा प्रकार असून या महोत्सवात विद्यार्थी असुरक्षित आहेत, असा आरोप करीत नागरिकांनी याप्रश्नी विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले. एफटीआयआयच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा छळ आरंभला आहे. ५५ जणांनी प्रतिनिधी पदासाठी अर्ज केले होते, पैकी २0 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, आता त्यांनाही प्रवेश नाकारण्यात येत आहे. रविवारी दहा जणांना रोखण्यात आले. एकाचे ओळखपत्र रद्द करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली. दोन माजी विद्यार्थी किस्ले गोन्साल्वीस व शुभम यांना उद्घाटन समारंभ उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. नंतर या दोघांची प्रत्येकी १0 हजार रुपयांच्या हमीवर सुटका करण्यात आली. या विद्यार्थ्यांचे वकीलपत्र घेतलेल्या अॅड. आल्बेर्टिना आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांविरुद्ध गोंधळ घातल्याप्रकरणी भादंसंच्या कलम ३५३, अतिक्रमण केल्याप्रकरणी कलम ४४८, बोगस नावाने प्रवेश घेतल्याप्रकरणी कलम ४१९ आणि (पान २ वर)
एफटीआयआय विद्यार्थ्यांचा इफ्फी आयोजकांकडून छळ
By admin | Updated: November 23, 2015 02:21 IST