शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

थंडी ताप तपासण्यासाठी लोकांची आरोग्य केंद्रावर गर्दी ; डेंग्यूची भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:57 IST

पावसामुळे थंडी ताप वाढल्याने लाेक डेंग्यूच्या भितीने तपासणी साठी जात आहेत.

नारायण गावस

पणजी: राज्यात सध्या डेंग्यू मलेरियाचे रुग्ण मिळत असल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे. तसेच आता पावसाळ्यात लाेकांना थंडी खाेकला सारखा आजार वाढल्याने अनेक लोक आराेग्य केंद्रावर तपासणीसाठी जात आहेत. पणजी आरोग्य केंद्रावर बुधवारी तपासणीसाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या.  पावसामुळे थंडी ताप वाढल्याने लाेक डेंग्यूच्या भितीने तपासणी साठी जात आहेत.

राज्यात पावसाळ्यात लहानापासून माेठ्यांना सर्वांना थंडी ताप सारखे आजार वाढतात. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरिया सारखे आजार वाढत असतात. सध्या राज्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आराेग्य मंत्र्यांना आरोग्य खात्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आराेग्य खात्यातर्फे  तपासणी सुरु आहे. लाेकांना थंडी खाेकला झाल्यावर आरोग्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक लोक सरकारी तसेच खासगी रुग्णालयात डाॅक्टरांकडून थंडी ताप तपासणीसाठी करुन घेत आहेत.

आरोग्य खात्याकडून जनजागृती

राज्यात डेंग्यू मलेरिया तसेच थंडीचे आजारपसरु  नये यासाठी जनजागृती केली आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी लाेकांना पावसाळ्यात आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  राज्यात डेंग्यू मलेरियाचे प्रमाणे परराज्यात आता झिकाचे रुग्णही आढळत असल्याने त्या पाश्वभूमीवर आराेग्य खाते सतर्क झाले आहे. राज्यात लाेकांना असे आजार पसरु नये  यासाठी  ठिकठिकाणी पाहणी  केली जात आहे. सतेच डेंग्यूच्या हॉटस्पॉटवर जागृती वाढविली आहे.

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आम्ही डेंग्यू मलेरियाविषयी  सतर्कता व जगृती वाढविली आहे. तसेच लोकांना थंडी खाेकला या सारखे आजार अंगावर न काढण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे लाेकांनी  आरोग्याची तपासणी करुन घेत आहे.  आरोग्य खात्याचे कर्मचारी सर्व हॉटस्पाॅट ठिकाणावर नजर ठेऊन आहेत.