शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पटिदार यांच्यावर महिनाभरात आरोपपत्र

By admin | Updated: August 7, 2014 01:20 IST

वासुदेव पागी ल्ल पणजी चार वर्षांपूर्वी लाच घेताना पकडलेले सहकारी बँकेचे माजी निबंधक आणि प्रोव्हेदोरियाचे संचालक पी. के. पटिदार यांचे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविलेल्या

वासुदेव पागी ल्ल पणजी चार वर्षांपूर्वी लाच घेताना पकडलेले सहकारी बँकेचे माजी निबंधक आणि प्रोव्हेदोरियाचे संचालक पी. के. पटिदार यांचे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविलेल्या आवाजाच्या नमुन्याच्या अहवालात पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आवाज हा पटिदार यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पटिदार यांना ३० जून २०१० रोजी पणजी येथील सहकारी भवनात त्यांच्या निबंधक कार्यालयात कंत्राटदाराकडून १५ हजार रुपये घेताना पकडले होते. एकूण २.३ लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली होती. पकडलेली रक्कम हा पहिला हप्ता होता. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या (एसीबी) सापळ्यात ते अडकले होते. त्या वेळी लाच घेताना कंत्राटदार (तक्रारदार) आणि पटिदार यांच्या संवादाचे छुप्या कॅमऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केले होते. तसेच १५ हजार रोख रुपये जे पटिदार यांना दिले होते. त्यावर एसीबीकडून विशिष्ट पावडर लावली होती. ती त्यांच्या हाताला लागल्यामुळे पाण्यात हात घातल्यावर पाण्याला विशिष्ट रंग चढला होता. त्यानंतर संवाद रेकॉर्डिंगचे तसेच पाण्याचे नमुने हैदराबाद येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत चाचणीस पाठविले होते. पाण्याच्या नमुन्याचा म्हणजे रासायनिक अहवाल यापूर्वीच आला होता. त्यात पटिदार दोषी ठरले होते; परंतु पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी संवाद चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तो ही मिळाल्याने पटिदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. महिनाभरात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सूत्रांकडून समजले. आठवड्यात या चाचणीचा अहवाल एसीबीला मिळाला आहे. शेतकऱ्यांना पशुखाद्य पुरविणाऱ्या एका कंत्राटदाराला त्यांचे २३ लाख रुपयांचे बिले देण्यासाठी त्याच्याकडे पटिदार यांनी दहा टक्के रुपये, म्हणजे २.३ लाख रुपये लाच मागितली होती. कंत्राटदाराने याची माहिती दक्षता खात्याला दिली होती. दक्षता खात्याचा अंमलबजावणी विभाग असलेल्या एसीबीकडून सापळा रचून पटिदार यांना पैसे घेताना पकडले होते. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. पटिदार पकडले गेले तेव्हा त्यांना सेवेतून निलंबित केले होते; परंतु नंतर त्यांचे निलंबन मागे घेतले होते. सध्या ते प्रोव्हेदोरियाचे संचालक आहेत.