पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार येत्या रविवारी आपल्या कारकिर्दीचे एक वर्ष पूर्ण करत आहे. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रात संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री बनले. त्यास येत्या रविवारी बारा महिने होत आहेत. सरकारचे एक वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पार्सेकर सोमवारी सायंकाळी दिल्लीस रवाना झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री भेटतील. तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत पार्सेकर यांची मंगळवारी इफ्फीच्या आयोजनाविषयी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. (खास प्रतिनिधी)
पार्सेकर सरकारची येत्या रविवारी वर्षपूर्ती
By admin | Updated: November 3, 2015 02:16 IST