शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 20:18 IST

मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पणजी : काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. कारण मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गृह खाते झोपलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पर्रीकर यांना पूर्वीही लोकांची सहानुभूती नव्हती व आता तरी मुळीच राहिलेली नाही, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महिलांवर हात टाकला. आमच्यावर हल्ला केला. अशा प्रकारच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सतिश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणले आहे. आपण भाजपच्या कृतीचा निषेध करते, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे अशिक्षित खासदार असून तेही काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावेळी पुढे होते, असे कुतिन्हो म्हणाल्या. 

लोकशाहीत गुद्दे चालत नाहीत, मुद्दे असावे लागतात. मुद्दे संपल्याने भाजप गुद्दय़ांवर आला. आम्ही देखील कमी नाही पण आम्ही असला हिंसक मार्ग स्वीकारणार नाही, आम्ही मुद्दे मांडू, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे म्हणाले. 

राहुल गांधींकडून कौतुक लोकशाही भाजपला निराश करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेबाबत सोशल मिडियावरून व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर नियोजितपणे भाजपने हल्ला केला. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भ्याड हल्ला करण्यासाठी जे आले होते, त्यांचे बॉस दिल्लीत बसतात. काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे गांधी यांनी म्हटले आहे. गोव्यातील महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी जी गांधीगिरी केली, त्याविषयी अभिमान वाटतो. अशा प्रसंगातच खरे कोण ते कळून येत असते, असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरRahul Gandhiराहुल गांधी