शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव,धर्मेंद्र शर्मांची दिल्लीला बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:56 IST

गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे.

पणजी : गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे. राय यांनी यापूर्वी गोव्याच्या प्रशासनात प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. परिमल राय हे १९८५ बॅचचे अ‍ॅग्मू केडरचे आयएएस अधिकारी आहेत. संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. ३१ डिसेंबर २0१६ रोजी आर. के. श्रीवास्तव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर धर्मेंद्र शर्मा यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा ताबा देण्यात आला होता. त्याआधी शर्मा हे बांधकाम खात्याचे तसेच वाहतूक, दक्षता आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम पहात होते. परिमल राय यांना गोवा नवीन नाही. येथे बराच काळ काम करुन तीन वर्षांपूर्वी त्यांची दिल्लीला बदली झाली होती. 

राय यांनी संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. ते अनुभवी व ज्येष्ठ अधिकारी आहेत. गोवाही आधी संघप्रदेश होता. राय यांच्या या अनुभवाचा फायदा गोव्याला मिळणार आहे. संघप्रदेश प्रशासकाला धोरणात्मक निर्णय तसेच दैनंदिन प्रशासनाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्याचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेला सल्लागार अधिकारी करीत असतो. प्रशासकाचे सर्व वित्तीय अधिकारही या पदावरील अधिका-याला असतात. दरम्यान, कार्मिक खात्याच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता शर्मा यांना गोव्याच्या सेवेतून मोकळीक देण्यासंबंधीची फाइल सरकारला पाठवली जाईल, असे सांगण्यात आले.  

टॅग्स :goaगोवा