शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पॅराग्लायडिंग बेतले जीवावर

By admin | Updated: May 25, 2016 02:50 IST

मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करत असताना खाली कोसळून समुद्रात वाहून गेल्यामुळे खडकरपूर-कोलकाता

मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करत असताना खाली कोसळून समुद्रात वाहून गेल्यामुळे खडकरपूर-कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील शशी शेखर प्रसाद (वय ४९) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. शशी शेखर हा पॅराग्लायडिंग करत असताना त्याने घातलेले सुरक्षा जॅकेट पॅराशूटपासून सुटल्यामुळे तो खाली पाण्यात कोसळला व समुद्राच्या लाटांबरोबर समुद्रात ओढला गेला. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रथम एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. त्याची स्थिती पाहून त्याला खासगी इस्पितळातून मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. शशी शेखर प्रसाद कोलकाता येथील फेडरल ब्रँडिंग कंपनीत उच्च पदावर काम करत होता. त्याच्या कंपनीतील इतर काही अधिकारी परिवारासह गोव्यात एका अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. हे सर्वजण उतोर्डा येथील एका तारांकित हॉटेलात उतरले होते. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शशी शेखर आपल्या पत्नीसह गोवा दर्शनसाठी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आला होता. पॅराग्लायडिंग पाहून त्याला मोह आवरला नाही. जीवनात प्रथमच अनुभव घेत असलेला हा साहसी खेळ अंतिम खेळ ठरला. पॅराग्लायडिंग करणाऱ्या बोटमालकांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पतीला प्राण गमावावे लागल्याचा आरोप शशी याच्या पत्नीने केला आहे. शशी शेखर हा प्रकृतीने स्थूल असल्यामुळे त्याला ते जॅकेट होत नव्हते. असे असतानाही त्याच स्थितीत त्याला जॅकेट घालून पॅराशूटवर चढवले, असा आरोप त्याच्या पत्नीने केला. (प्रतिनिधी)