शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पॅरा शिक्षक महिलांचं भाजपाच्या येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 19:41 IST

पणजी : वी वॉन्ट जस्टीस अशा जोरदार घोषणा देत आणि सरकारने आपल्या दूरवर बदल्या करून अन्याय केल्याचा दावा करत राज्यातील पॅरा शिक्षक महिलांनी भाजपाच्या येथील कार्यालयासमोर बुधवारी मोठे धरणे आंदोलन केले.

पणजी : वी वॉन्ट जस्टीस अशा जोरदार घोषणा देत आणि सरकारने आपल्या दूरवर बदल्या करून अन्याय केल्याचा दावा करत राज्यातील पॅरा शिक्षक महिलांनी भाजपाच्या येथील कार्यालयासमोर बुधवारी मोठे धरणे आंदोलन केले. भाजप कार्यालय असलेल्या इमारतीच्या प्रवेश दारालाच पॅरा शिक्षिकांनी घेराव घातला.काहीशा तंग वातावरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे कडेकोट पोलीस बंदोबस्तात भाजपा कार्यालयातून आपल्या वाहनाच्या ठिकाणी गेले. त्यांच्या मागे जात महिला शिक्षिकांनी घोषणाबाजी केली. आपल्याला वेतन कमी मिळते व तरीही सरकारने मुद्दाम आपल्या दूरवर बदल्या केल्या आहेत, असे पॅरा शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यांना सेवेत कायम केले जावे अशीही मागणी आहे. दूरवर झालेल्या बदल्यांमुळे आपल्यावर मोठा अन्याय झाला असून वाहतुकीवरच बहुतांश पैसा खर्च होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.आपले म्हणणे मांडण्यासाठी पॅरा शिक्षक महिला प्रथम बुधवारी सकाळी पर्वरी येथील सचिवालयासमोरील मुख्य प्रवेशदारावर जमल्या. तिथे त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री पर्रिकर हे पत्रकार परिषद घेण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात आले होते. पॅरा शिक्षिकांना ही माहिती मिळताच त्यांनी आपला मोर्चा भाजपच्या कार्यालयाकडे वळवला. पॅरा शिक्षिकांनी घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला. बरेच पोलिस भाजप कार्यालयाच्या मुख्य दाराकडे ठेवण्यात आले.पत्रकार परिषद संपवून मुख्यमंत्री सर्वप्रथम बाहेर निघू लागले. यावेळी आपले म्हणणे ऐकून घ्यावे असा आग्रह पॅरा शिक्षक महिलांनी धरला. मात्र पोलीस बंदोबस्तात मुख्यमंत्री पुढे पुढे जाऊ लागले. ते त्यांच्या वाहनाकडे जात असतानाच त्यांच्या मागे सगळ्या महिला पॅरा शिक्षक जाऊ लागल्या. आम्ही देखील पणजी मतदारसंघातील आहोत, आमचे म्हणणो ऐकून घ्या, असे काही शिक्षिका म्हणाल्या. मुख्यमंत्री पुढे जातच राहिले. सरकारविरुद्ध महिला शिक्षिकांनी जोरदार घोषणा दिल्या. मुख्यमंत्री आपल्या वाहनात बसले व निघून गेले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर हे यावेळी भाजपाच्या कार्यालयातच बसून होते. मात्र मुख्य दारावरून आंदोलक पॅरा शिक्षक मागे हटेना. एक तासानंतर तेंडुलकर हे भाजपच्या कार्यालयाबाहेर आले.गेल्या निवडणुकीवेळी तेंडुलकर यांनीच आमच्या मागण्या मान्य करणारे पत्र आम्हाला भाजपतर्फे दिले होते, असे पॅरा शिक्षकांनी पत्रकारांना सांगितले. त्यांनी ते पत्रही दाखवले. आमच्याकडून मते घेतली पण आमचा प्रश्न सोडविला जात नाही, असे पॅरा शिक्षकांनी सांगून तेंडुलकर यांना घेराव घातला. यावेळी तेंडुलकर त्यांना काहीच उत्तर देऊ शकले नाही. मिश्कील हास्य करत तेंडुलकर तिथून पोलिस बंदोबस्तातच निसटले.