शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकास प्रकल्प रोखण्याचा अधिकार पंचायतींना नाही: पंचायतमंत्री माविन गुदिन्हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:08 IST

अर्जदार न्यायालयात गेल्यास होईल अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील अनेक प्रकल्पांना ग्रामसभांमध्ये विरोध केला जात आहे. परंतु, घटनात्मक तरतुदीनुसार ग्रामसभांना प्रकल्प रोखण्याचा अधिकारच नाही, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले.

कोणताही प्रकल्प येत असल्याचे समजल्यानंतर त्याला विरोध केला जात आहे. ग्रामसभांमध्ये अशा प्रकल्पांविरोधात ठराव संमत केले जातात परंतु हे कायद्याला धरून नाही, असे गुदिन्हो यांनी सांगितले. अर्जदार न्यायालयात गेल्यास गोव्यात अडचण होईल, असे ते सांगतात. मात्र, लोकांना आपापल्या भागात येणाऱ्या प्रकल्पांबाबत समजून घ्यायला हवे, असे आवाहनही गुदिन्हो यांनी केले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, ग्रामसभेत उपस्थित केलेले मुद्देही चुकीचे नसतात. कोणत्या ठिकाणी किती क्षमतेचे प्रकल्प येऊ शकतात, याची सविस्तर माहिती त्या भागातील लोकांना द्यायला हवी तसेच प्रकल्पांची आखणी करताना संबंधित गावाची क्षमता तपासली जाते का? असे विचारले असता मंत्री गुदिन्हो यांनी गावाची क्षमता तपासण्यासाठी संबंधित खात्यांकडून माहिती घेतली जाऊ शकते, असे सांगितले.

मुरगाव बंदरावर बाहेरच्या ठेकेदारांचे ट्रक : संकल्प

मुरगाव बंदरावर स्थानिक ट्रक मालकांची कामे काढून ती बाहेरील ठेकेदारांना दिली जात आहेत. त्यामुळे अनेक गोमंतकीय कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. कार्यरत गोमंतकीय परिवहन व्यावसायिकांच्या उपजीविकेवर आलेल्या संकटांची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी अधिवेशनात केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपण याविषयी केंद्रीय मंत्रालयाशी चौकशी करून याविषयी तोडगा काढण्याचे आश्वासन आमदारांना दिले. आमदार आमोणकर म्हणाले की, सध्या मुरगाव बंदरावर तामिळनाडूतील ट्रक वाहतूक करत आहेत. याचा फटका स्थानिक ट्रक मालकांना बसला आहे. स्थानिकांशी करार न देता बाहेरील कंपन्यांना दिले जात आहे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण