शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर बांधकामाना थारा देणारे पंचायत सचिव होणार निलंबीत; माविन गुदिन्हो यांची माहिती

By वासुदेव.पागी | Updated: February 8, 2024 13:40 IST

पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामाच्या विषयावर विधानसभेत चर्चा सुरू होती.

पणजीः बेकायदेशीर बांधकामाना थारा देणारे पंचायत सचिव आणि गट विकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत  दिली. त्यानंतर कुणीही मंत्री आणि आमदारांनी निलंबन मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकू नये असे त्यांनी सांगितले. 

पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामाच्या विषयावर विधानसभेत चर्चा सुरू होती. विरोधीपक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार वेन्झी विएगश यांनी संयुक्तरित्या हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पंचायत सचिव लोकांची सतावणूक करीत असल्याचे सांगितले.  कायदेशीर असलेल्या फायली अडवून धरत असल्याचेही सांगितले. आम आदमी पार्टीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनीही अशाच तक्रारी पंचायत सचीवांच्या विरोधात केल्या. मुद्दामहून गैरहजर राहणे आणि वेगवेगळी निमित्ते करून कामे टाळणे असे प्रकार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी आपण या विषयी गांभिर्याने विचार करीत असल्याचे सांगितले. बेकायदेशीर बांधकामांना थारा देणारे, लोकांशी असहकार्य करणारे आणि फायली विनाकारण अडवून ठेवणारे पंचायत सचिव आपल्या रडारवर असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास त्यांच्याबरोबरच गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार. परंतु त्यानंतर कुणीही आमदार व मंत्र्यांनी हे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी करू नये. याविषयी मला मूक्तहस्त द्यावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे असेही मंत्री म्हणाले. ही कारवाई करण्यासाठी गरज पडल्यास पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करावी लागली तरी ती केली जाईल असेही ते म्हणाले.

सचीव बिडिओ सेटिंगपंचायतराज कायद्यातील दुरुस्तीनंतर सरपंचाचे अधिकार सचिव आणि गटविकास अधिकाऱ्यांना (बिडिओ) दिल्यावर त्याचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला. अनेक ठिकाणी सचिव आणि बिडिओ यांचे सेटिंग असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे या दोघांवरही कारवाई होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा