शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:20 IST

सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत. 

उसगाव : अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. पणजी येथील पालिका बागेसमोरील वेलव्होस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयटक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीची अंमलबजावणी आणि पंचायत कर्मचाऱ्यांना लाभ विषयावर संघटनेच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात येईल. सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत. 

सातव्या वेतनाचे फायदे पंचायत कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी पंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील संघर्षाचा आराखडा तयार करण्यात येईल. सभेत मागील सभेचा अहवाल वाचून मंजूर करण्यात येईल. संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येईल. गट समिती आणि संघटनेचे पदाधिकारी यांचे कामकाज विषयावर चर्चा करण्यात येईल. पंचायत कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय करण्यात येईल.

सभेच्या अध्यक्षांच्या मान्यतेने इतर कोणत्याही बाबीवर चर्चा करण्यात येईल. सभेला राज्यातील सर्व पंचायत कामगार, पदाधिकारी, समिती सदस्य,  प्रत्येक पंचायतीतील सर्व संघटनेच्या सदस्यांनी ह्या सभेला आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष नाईक व आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले आहे.

टॅग्स :goaगोवा