शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पणजी : पत्रादेवी-बांबोळी महामार्ग चौपदरीकरण, कामाचा येत्या तीन महिन्यात होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 12:53 IST

पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे.

पणजी : पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे. एम्. व्यंकट राव इन्फ्रा प्रा. लि, आणि नवयुग इंजिनीयरिंग कंपनीला त्यासाठीचे कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. बांबोळी ते पोळे या दक्षिण गोव्यातील उर्वरित चौपदरीकरणाचे पॅकेज अद्याप निश्चित व्हायचे आहे.पत्रादेवी ते बांबोळी चौपदरीकरणाचे काम पत्रादेवी ते करासवाडा आणि करासवाडा ते बांबोळी असे दोन टप्प्यात होणार आहे. पत्रादेवी ते करासवाडा महामार्गाचे काम कमी बोली लावल्याने एमव्हीआर कंपनीला तर करासवाडा ते बांबोळी महामार्गाचे काम नवयुग कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांना लवकरच वर्क आॅर्डर दिली जाईल, असे बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले. वर्क आॅर्डर बहाल केल्यानंतर प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरु होईल आणि तीन वर्षात ते पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बांबोळी ते पोळे महामार्गाचे पॅकेज अजून निश्चित झालेले नाही.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची पनवेल ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरकरणाची ही योजना आहे. गोव्यात पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जास्त घरे जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे. पर्वरी येथे महामार्गाच्या दुतर्फा मोठी वस्ती असल्याने या भागात दोन ते तीन किलोमिटर लांबीचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर येईल, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.या चौपदरीकरणानंतर गोव्यातील एका टोकापासून दुसºया टोकापर्यंतचा प्रवास अल्प वेळेत होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवा