शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत अखेर पणजीचा समावेश

By admin | Updated: May 25, 2016 02:50 IST

पणजी : स्मार्ट सिटीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत गोव्याची राजधानी पणजी शहराचा समावेश झालेला असून एकूण १७७५ कोटी रुपये खर्चाच्या

पणजी : स्मार्ट सिटीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत गोव्याची राजधानी पणजी शहराचा समावेश झालेला असून एकूण १७७५ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मार्ट सिटीसाठी पाच वर्षांत ५३४ कोटी रुपये तसेच केंद्राची अमृत योजना आणि अन्य मिळून १७७५ कोटी रुपयांची कामे शहरात होतील. यात नागरी बस वाहतूक सेवेचाही समावेश आहे. ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ अर्थात शहरात कुठेही बसमध्ये चढून कुठेही उतरता येईल. त्यासाठी चार वेगवेगळे मार्ग निश्चित केले जातील. मंगळवारी सकाळी केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिल्लीत १३ स्मार्ट शहरांची नावे जाहीर केल्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली. दुसऱ्या यादीत पणजी आठव्या स्थानावर आहे. १३ शहरांची यादी जाहीर झाली, त्यात लखनौ पहिल्या स्थानी आहे. पणजीत पॅन सिटी आणि विभागनिहाय अशा दोन वर्गवाऱ्यांमध्ये ही विकासकामे होणार आहेत. ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ पद्धतीवर शहरात नागरी बससेवेसाठी चार मार्ग निश्चित केले जाणार आहेत. १८ जून रस्ता व शहरातील अंतर्गत परिसर, ताळगाव-सांतइनेज, कदंब बसस्थानक ते दोनापावल, बांबोळी असे हे मार्ग असतील. घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा, चर्च स्क्वेअर परिसराचा कायापालट, रुअ द औरे खाडीचा विकास, मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा, मळा तलावाचे पुनरुज्जीवन, एकात्मिक शहर जल व्यवस्थापन, मळा येथील वारसास्थळातील सेवा सुधारणा आदी कामांचा यात समावेश असेल. (प्रतिनिधी)