शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावत सिनेमा गोव्यात का नाही? सिनेरसिकांचा प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 18:30 IST

गोव्यातील सिनेमागृह मालक संघटनेने पद्मावत चित्रपट गोव्यात दाखविणार नाही असा निर्णय घेतला असल्याने जे पद्मावत चित्रपटाची आतुरतेने  वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे.

पणजी - गोव्यातील सिनेमागृह मालक संघटनेने पद्मावत चित्रपट गोव्यात दाखविणार नाही असा निर्णय घेतला असल्याने जे पद्मावत चित्रपटाची आतुरतेने  वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे. या निर्णयाला गोमंतकीयांनी तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी विरोध केला आहे.  काही सिनेमागृहांमध्ये मात्र पद्मावत प्रदर्शित केला जात असल्याचे माहिती मिळाली. 

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान बरोबर गोव्यात सुध्दा पद्मवात प्रदर्शित न केल्याने गोमंतकीयांकडून अनेक माध्यमांतून निषेध होत आहे. सोशल मिडीया साईट्वर तर पद्ममावत गोव्यात प्रदर्शीत न केल्याने अनेक विनोद, विरोध  व निषेधाचे पोस्ट केलेले दिसत आहेत. प्रत्येक विचारांची कदर करणा-या व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान देणाºया  गोवा सारख्या राज्यात अशा तºहेचे बंद कधीच अनुभवायला न आल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 वास्कोतील १९३० या सिनेमागृहात व  फोंडा येथील कार्नव्हाल सिनेमा या सिनेमामध्ये पद्मावत प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्या सिनेमागृहामध्ये चित्रपट दाखविण्यात येत आहे तेथे तीन दिवसाचे आदीच तिकीट बुकींग झालेले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पद्मावत प्रदर्शित झालेल्या या सिनेमागृहांच्या ठिकाणी पोलिसांची कडक बंदोबस्त आहे. पणजी येथील सम्राट अशोक  झी स्क्वॅर सिनेमागृहात पद्मावतचा फलक मारला असून भरपूर लोक येथे विचारपूस करून जात आहेत. पण येथे चित्रपट प्रदर्शित केला नाही. हा फलक महिना अगोदरच मारला होता असे येथे काम करणा-या कर्मचा-यांनी सांगितले. 

काही लोकांचा पद्मावत चित्रपटाला विरोध असून अखिल गोवा थेटर्स मालक संघटनेने हा चित्रपट सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स मध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी व आमदार प्रविण झांटये यांनी सांगितले. या अंतर्गत गोव्यातील १८ ते २० सिनेमागृहांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेने मिळून हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. 

पद्मावत चित्रपट पाहून देशद्रोह होत असेल तर मी हा देशद्रोह करणार आहे. गोव्यात कधी नव्हती ती दुदैवी परिस्थीती आली आहे. गोव्यातील सिनेमागृहामध्ये जर हा चित्रपट दाखविला जात नसेल तर बेळगांव मध्ये संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाऊन पद्मावत बघणार. आपल्या नावावर एक देशद्रोह झाला तरी हरकत नाही. 

- ज्ञानेश मोघे- चित्रपट दिग्दर्शक

 

सर्वोच्च न्यायालयाचा पद्मावत चित्रपट दाखविण्याचा आदेश आहे. तसेच सेन्सर बोर्डने सुध्दा या चित्रपटातील आक्षेपार्ह्य सीन्सनां कातरी लावण्यात आली आहे तसेच चित्रपटाचे नाव सुध्दा बदलण्यात आले आहे. हा चित्रपट बघल्यास काहीही राष्ट्रदोह वैगरे होणार नाही. न्यायालय व सेन्सर बोर्डने हिरवा कंदील दाखविलेल्या या चित्रपटाला अशा तºहेचा बंद निषेधार्ह्र आहे. 

- धर्मानंद वेर्णेकर- चित्रपट दिग्दर्शक

टॅग्स :Padmavatपद्मावतgoaगोवाentertainmentकरमणूक