‘पणजी : ‘होय, मी पोर्तुगीज नागरिक आहे!’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोमंतकीय पॉप सिंगर, ‘पद्मश्री’ रेमो फर्नांडिस याने बुधवारी नागरिकत्वाची कबुली दिली व गोमंतकीयांना भावनिक धक्काच बसला. मूळ शिवोली येथील असलेला रेमो हा नेहमी गोव्याच्या कल्याणाची भाषा बोलत आला आहे. निवडणूक आयोगाचा तो यापूर्वी गोव्यासाठी अॅम्बेसेडरही होता. मात्र, त्याने भारतीय नागरिकत्व सोडले असून तो पूर्णपणे पोर्तुगीज बनला आहे. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेणे यात काहीच गैर नाही किंवा लज्जास्पद नाही, असाही दावा रेमोने केला. मी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. माझ्याजवळ ओसीआय कार्ड आहे. (पान २ वर)
पद्मश्री’ रेमो फर्नांडिस म्हणतात, होय, मी पोर्तुगीज!
By admin | Updated: December 24, 2015 01:53 IST