शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पद्मभूषण लक्ष्मण पै यांनी जागविल्या बालपणातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:00 IST

प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले कला शिक्षण त्याचबरोबर आपल्या जुन्या सवंगडय़ांच्या आठवणी त्यांनी जागविल्या.

मडगाव :  प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले कला शिक्षण त्याचबरोबर आपल्या जुन्या सवंगडय़ांच्या आठवणी त्यांनी जागविल्या.लक्ष्मण पै यांचे मुळ नाव लक्ष्मण पै फोंडेकर. कोंब-मडगाव येथील फोंडेकर यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा 93 वर्षापूर्वी जन्म झाला होता. नंतर ते मुंबईत जाऊन चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. दुरदर्शनतर्फे त्यांच्यावर एक लघुपट तयार केला जात असून त्याच निमित्ताने त्यांच्या जुन्या घराचे चित्रण करण्यासाठी दूरदर्शनचा क्रू मडगावात आला होता. त्यांच्याबरोबर लक्ष्मण पै हे आपले अमेरिकेत असलेले पुत्र आकाश पै यांच्यासह दाखल झाले होते. विशेष बाब म्हणजे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या या वडिलोपार्जित घराला दिलेली ही पहिलीच भेट होती.आपल्या कला शिक्षणाबद्दल सांगताना पै म्हणाले, मडगावातील प्रसिद्ध छायाचित्रकार रामनाथ मावजो  हे माङो मामा. ते जरी छायाचित्रकार असले तरी ब:यापैकी पेंटरही होते. त्यांच्याच स्टुडिओमध्ये मी चित्रकलेकडे आकृष्ट झालो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे प्राथमिक धडे मी गिरवले.आपल्या शिक्षणाबद्दल सांगताना, पॉप्युलर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण झाले. गोव्याचे माजी उद्योगमंत्री स्व. बाबू नायक हे व त्यांचे कनिष्ठ बंधु मोहनदास नायक हे आपले त्यावेळचे सवंगडी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या खेळाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, फुटबॉलसारख्या खेळात आम्हाला तसा फारसा रस नव्हता. त्यावेळी आम्ही विटू दांडू सारख्या देशी खेळातच अधिक रमायचो.पद्मभूषण पै हे डॉक्युमेंटरीनिमित्त मडगावात आलेले समजल्यावर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सपत्नीक जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मडगावचे आमदार दिगंबर कामत हेही यावेळी उपस्थित होते. पै यांचे जुने मित्र हरिश्र्चंद्र नागवेकर हेही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा