शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 21:36 IST

वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले.

ठळक मुद्देदहा हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे कारण प्रशासनाची ती गरज आहे. अनेक पदे रिकामी आहेत. येत्या डिसेंबर व जानेवारीपर्यंत आणखी अनेकजण सेवेतून निवृत्त होतील, तोपर्यंत दहा हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या असतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

पणजी : केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड घेत असते. यापुढे माझ्या सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा देखील रिपोर्ट कार्ड सादर होणार आहे. प्रत्येक राज्यातील भाजप सरकारकडून केंद्र सरकार रिपोर्ट कार्ड घेतेच, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले. 

वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मला भाजपने आपला चेहरा म्हणून जाहीर केले याविषयी मला आनंद वाटतो. भाजपची मते वाढण्यास ते मदतरुप ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दहा हजार नोकऱ्या शक्य दहा हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे कारण प्रशासनाची ती गरज आहे. अनेक पदे रिकामी आहेत. येत्या डिसेंबर व जानेवारीपर्यंत आणखी अनेकजण सेवेतून निवृत्त होतील, तोपर्यंत दहा हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या असतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर थोडा भार पडेल पण यापुढे स्थिती सुधारणार आहे असे ते म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा निश्चितच शक्य आहे. राज्यात भाज्यांचे, फुलांचे व दुधाचे उत्पादन वाढत आहे. मी आमदार झालो तेव्हापासून गोवा राज्य स्वयंपूर्ण व्हावे असा विचार करतोय. सरकारच्या सर्व योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हव्या. राज्यात १९ हजार विशेष व्यक्ती आहेत. अडिच हजार व्यक्तींपर्यंत आम्ही मोफत उपकरणे पोहचवली. पुढील वर्षभरात सर्व १९ हजार विशेष व्यक्तींपर्यंत साहित्य पोहचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने जे तीनशे कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रत्येकी एक कोटी रुपये पालिकांनाही दिले जातील. पंचायतींना एकूण १०० कोटी दिले जातील. गोव्यातील सामान्य माणसालाही मदत करण्याचा विचार आहे. गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करताना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे नूतनीकरण करण्यासाठी खर्चाचे आराखडे तयार होऊ लागले आहेत. गोवा मुक्तीच्या इतिहासाबाबत वस्तूसंग्रहालय देखील साकारणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी