शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

अन्यथा गोव्याचे वीजमंत्री काब्रालही करणार जंतरमंतरवर निदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:48 IST

मडगाव - गोव्यातील खाण अवलंबितांचा ताप आता स्थानिक आमदारांना सहन करावा लागत असून, बुधवारी त्याचा प्रत्यय कुडचडेचे आमदार असलेले ...

मडगाव - गोव्यातील खाण अवलंबितांचा ताप आता स्थानिक आमदारांना सहन करावा लागत असून, बुधवारी त्याचा प्रत्यय कुडचडेचे आमदार असलेले वीजमंत्री निलेश काब्राल यांना आला. यावेळी खाण अवलंबितांशी बोलताना खाण प्रश्र्नावर बोलणी करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे. प्रधानमंत्र्यांनी जर आपल्याला भेट नाकारली तर खाण अवलंबितांबरोबर आपणही दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करायला बसण्यास मागे-पुढे पहाणार नाही, असे ते म्हणाले.खाण अवलंबितांच्या प्रतिनिधींनी बुधवारी काब्राल यांची कुडचडे येथे भेट घेतली. यावेळी बोलताना काब्राल म्हणाले, गोव्यात खाणींचा लिलाव केल्यास नवीन कंपन्या या खाणीत काम करणाऱ्या 70 हजार कामगारांना सामावून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे गोव्यातील खाणी संदर्भात वेगळा कायदा हाच त्यावर उपाय आहे. केंद्र सरकारच्या कायदा खात्याने सध्याच्या खाण कायद्यात सरकारने बदल करु नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला बाजूला सारुन आता प्रधानमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात निर्णय घेण्याची गरज आहे. हे पटवून देण्यासाठीच आपण व सभापती प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्र्यांची भेट मागितली आहे. ही अपॉयन्टमेंट जर मिळाली नाही तर लोकांबरोबर दिल्लीत जाऊन निदर्शनाच्या मार्गे भेट घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाने आपल्यावर पक्षविरोधी कृती केल्याच्या आरोपाखाली त्यानंतर कारवाई केली तरी आपल्याला पर्वा नाही असे ते म्हणाले.काब्राल यांनी यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल कडूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. वास्तविक गोव्यात अजुनही 24 खाणी अशा आहेत ज्या 2020 र्पयत चालू शकतात. निदान त्या खाणी तरी चालू ठेवाव्यात अशी मागणी आपण केली होती. मात्र सरकारकडून या मागणीलाही प्रतिसाद मिळालेला नाही. आमचे एजी कदाचित वरुन निर्णय घेत असावेत असा टोमणाही त्यांनी मारला.गोव्यात एकूण 523 खाणी आहेत त्यापैकी 123 खाणी चालू होत्या. त्यातील 88 खाणींचे लिज परवान्यांचे नुतनीकरण झाले होते. निदान या खाणींबाबत तरी केंद्र सरकारने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे. इतर खाणींचा लिलाव केला तर हरकत नाही. पण 88 खाणी आहे त्या लिज धारकांद्वारेच त्या चालविल्या पाहिजेत अशी मागणी आपण प्रधानमंत्र्यांकडे करणार असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार