शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वैद्यकीय पर्यटन धरतेय मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:43 IST

वर्षाला ६० लाख पर्यटक देणा-या गोव्यात आता वैद्यकीय पर्यटनही हळूहळू मूळ धरू लागले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच दृष्टिकोनातून गोवा सरकारच्या सहकार्याने काही प्रकल्पांचे नियोजन

सद्गुरू पाटीलपणजी : वर्षाला ६० लाख पर्यटक देणा-या गोव्यात आता वैद्यकीय पर्यटनही हळूहळू मूळ धरू लागले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच दृष्टिकोनातून गोवा सरकारच्या सहकार्याने काही प्रकल्पांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. विदेशी पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेता या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.१० वर्षांपूर्वी गोव्यात केवळ वीस-बावीस स्पा होते. आता त्यांची संख्या दीडशेपेक्षा जास्त झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी गोव्यात केवळ तीन-चार योग केंद्रे असायची. आता तीसपेक्षा जास्त योग केंद्रे आहेत. किनारपट्टी भागांमध्ये विदेशी पर्यटक योग, प्राणायाम करतात. गोव्यात राष्ट्रीय नॅचरोपथी संस्था उभी करावी, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाने ठरविले आहे. त्यासाठी पेडणे तालुक्यात जमीनही घेतली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. पर्यटनाची सांगड वैद्यकीय क्षेत्राशी घालावीच लागेल. त्यातून अधिक रोजगार संधी निर्माण होतील. गोमंतकीयांना रोजगार मिळेल. वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी वेळ लागेल, असेही राणे म्हणाले.केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे गोव्याचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही वैद्यकीय पर्यटन विकासात अधिक रस आहेत. आयुर्वेदामध्ये विदेशी पर्यटकांना खूप रस आहे. गोव्यात आयुर्वेदाचा प्रसार यापुढे अधिक होणार आहे. राष्ट्रीय नॅचरोपथी संस्था आम्ही उभी करूच; शिवाय आयुर्वेद आणि नॅचरोपथी यांचे संशोधन केंद्रही उभे करणार आहोत. आयुष मंत्रालयाची दोन इस्पितळेही उत्तर व दक्षिण गोव्यात साकारणार आहोत, असे नाईक यांनी सांगितले.