शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

गोव्यात संगीत महोत्सवांना अमली पदार्थांचा विळखा; कायदेशीर कारवाईला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 03:15 IST

अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचा पोलिसांनी कितीही आव आणला असला, तरी मोठे मासे पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत. पोलिसांपेक्षा अमली पदार्थांचे नेटवर्क प्रचंड संघटित असल्याचे पोलिसांनीच जाहीरपणे मान्य केलेले आहे.

- सद्गुरू पाटील।पणजी : अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचा पोलिसांनी कितीही आव आणला असला, तरी मोठे मासे पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत. पोलिसांपेक्षा अमली पदार्थांचे नेटवर्क प्रचंड संघटित असल्याचे पोलिसांनीच जाहीरपणे मान्य केलेले आहे. गोव्याच्या किनारपट्टीवरील संगीत महोत्सवांना अमली पदार्थांच्या नशेने घट्ट विळखा घातला आहे. गोवा सरकारच्या पर्यटन आणि पोलीस खात्याने हा विषय प्रथमच खूप गंभीरपणे घेतला आहे.उत्तर गोव्यातील शिवोली, कळंगुट, मांद्रे या मतदार संघांमधील किनारपट्टीच्या भागात अमली पदार्थांचा व्यापार चालू नये, अशी स्पष्ट भूमिका जलसंसाधनमंत्री विनोद पालयेकर, आमदार मायकल लोबो व पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी घेतली. अमली पदार्थ व्यावसायिकांशी पोलिसांचे साटेलोटे असते व त्यामुळेच हा व्यवसाय फोफावला, अशी टीका मंत्री आजगावकर व पालयेकर, कृषिमंत्री विजय सरदेसाई व आमदार लोबो यांनी केली आहे. गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकारांची दखल घेतली व पोलीस यंत्रणा सक्रीय केली. परिणामी, १५ दिवसांत पोलिसांनी किनारपट्टीत २७ छापे टाकून एक कोटीपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. २७ जणांना अटक झाली आहे.15कोटींची बाकीसनबर्नचे आयोजन दरवर्षी गोव्यात केले जाते. यंदा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये महोत्सव होईल. सनबर्न व सुपरसोनिक हे दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव दरवर्षी किनारपट्टीत आयोजित केले जातात. आयोजकांकडून गोवा सरकारला एकूण ९.६७ कोटी रुपये येणे आहे. ६.२९ कोटी रुपयांचा मनोरंजन कर व अन्य शुल्क एका सुपरसोनिकच्या आयोजकांकडून येणे आहे, असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे.दोघा पर्यटकांचा मृत्यूउत्तर गोव्यातील हणजूण येथे संगीत रजनी वेळी अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोघा पर्यटकांचा मृत्यू झाला.गोव्यातील संगीत रजनीमध्ये अमली पदार्थांचा वापर होणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. सरकारने पोलिसांना सक्रिय केले आहे. आम्हाला चांगले संगीत महोत्सव झालेले हवे आहेत.- बाबू आजगावकर,पर्यटनमंत्री, गोवा