शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतींच्या मुलाविरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश द्या, राज्यपालांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 22:10 IST

रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी १६ जून रोजी त्याची निवड रद्द केली.

ठळक मुद्देबोगस पदवी प्रकरणात निवड होऊनही त्याच्याविरोधात अजून एफआयआर नोंद झालेला नाही. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. 

पणजी : गोव्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड याच्याविरुद्ध कारकून पदासाठी बोगस बीए पदवी प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन केली. 

रेमंड याने सादर केलेली बीए पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी १६ जून रोजी त्याची निवड रद्द केली. उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदाच्या १६ जागांसाठी जी निवड झाली होती त्यात रेमंड याचा समावेश होता. उर्वरित १५ जणांना सवेत रुजू करुन घेण्यात आले. बोगस पदवी प्रकरणात निवड होऊनही त्याच्याविरोधात अजून एफआयआर नोंद झालेला नाही. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले. 

रेमंडविरुध्द कठोर कारवाई केल्यास इतरांनाही संदेश जाईल आणि भविष्यात शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या बाबतीत खोटारडेपणा करण्याचे किंवा बोगस प्रमाणपत्रे सादर करण्याचे धाडस कोणी करणार नाही. आयरिश यांनी राज्यपालांना अशी विनंती केली आहे की, सरकारी खात्यांमध्ये भरतीच्यावेळी शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत अशी बोगस प्रमाणपत्रे उमेदवारांनी सादर करु नये यासाठी ती अत्यंत जबाबदारीने तपासण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश खातेप्रमुखांना द्यावेत, अशी मागणीही आयरिश यांनी केली आहे.  

टॅग्स :goaगोवा