शहरं
Join us  
Trending Stories
1
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
2
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
3
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
4
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
5
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
6
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
7
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
8
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
9
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
10
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
11
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
12
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
13
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
14
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
15
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
16
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
17
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
18
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
19
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
20
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या किना-यांवर फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक मोहीम, अटक करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 21:51 IST

किना-यांवर पर्यटकांना उपद्रव करणा-या फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सरकारने सुरु केली आहे. गुरुवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पर्यटन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन याबाबतीत काही आदेश दिले. 

पणजी : किना-यांवर पर्यटकांना उपद्रव करणा-या फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सरकारने सुरु केली आहे. गुरुवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच पर्यटन खात्याच्या अधिका-यांची बैठक घेऊन याबाबतीत काही आदेश दिले. बैठकीनंतर या प्रतिनिधीशी बोलताना मंत्री आजगांवकर म्हणाले की, भादंसंच्या कलम ३४ खाली अशा उपद्रवकारी विक्रेत्यांना थेट अटक करुन तुरुंगात टाकले जाईल. पोलिसांना या कामी पर्यटन खात्याचे वॉर्डन तसेच सुपरवायझरही मदत करतील. नाताळ, नववर्षानिमित्त देश, विदेशी पाहुण्यांची वर्दळ आता वाढणार आहे त्यामुळे किना-यांवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आलेली आहे. पोलिसांबरोबरच आयआरबीचे जवान तैनात केले जातील. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.  भिकारी, फिरते विक्रेते पर्यटकांना त्रास देत असतात अशा तक्रारी नेहमीच ऐकू येतात. अलीकडच्या काळात काही विदेशी नागरिकही किना-यांवर स्टॉल्स लावून बेकायदा व्यवसाय करतात. हरमल किनाºयावर विदेशींचे असे अनेक बेकायदा स्टॉल्स आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत ड्रग्सना थारा दिला जाणार नाही. सरकार ईडीएमच्या विरोधात नाही परंतु तेथे ड्रग्सचा वापर करण्यास मात्र सक्त विरोध असल्याचे आजगांवकर म्हणाले. किनाºयांवरील शॅकमध्ये बाटल्यांचा वापर केला जाऊ नये. कॅनच वापरावेत, असा फतवा मध्यंतरी खात्याने काढला होता. त्याचीही सक्त अंमलबजावणी चालू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. किना-यांवर दारुच्या बाटल्या फोडून टाकण्याचे प्रकार घडतात. वाळूतून चालताना या बाटल्यांच्या काचा पायाला रुतण्याचा धोका असतो त्यामुळेच हा फतवा काढण्यात आला होता. दरम्यान, किनारा सफाईच्या बाबतीत मंत्री म्हणाले की, लवकरच या कामासाठी नव्या निविदा काढल्या जातील. त्यासंबंधीची प्रक्रिया चालू आहे. तूर्त हंगामी कंत्राटावरे हे काम चालू आहे. किनाºयावर कचरा दिसल्यास कोणीही वॉटसअपवर त्याचा फोटो पाठवल्यास २४ तासांच्या आत कचरा काढला जातो.दरम्यान, किना-यांवर पुरेशी प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, सामान ठेवण्यासाठी लॉकर, पुरेशी पार्किंग व्यवस्था, किनाºयांवरील पर्यटनस्थळांचे सौंदर्यीकरण तसेच रोषणाई आदी प्रकल्प विचाराधीन असून प्रत्यक्ष फि ल्डवर इन्स्पेक्शन करुन ही कामे मार्गी लावली जातील, असे आजगांवकर यांनी स्पष्ट केले. आमदार आणि संबंधित पंचायतींना विश्वासात घेऊनच किनारी विकास आखण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जातील.आजगांवकर म्हणाले की, किनारी आमदारांनी आपापल्या भागातील पर्यटनविषयक अनेक समस्या याआधी मांडलेल्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न राहील. प्रसाधनगृहांची वगैरे पक्की बांधकामे केली जातील. सरकारकडे निधीची कमतरता नाही.

 

टॅग्स :goaगोवा