शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिट अँड रन कायद्याला गोव्यातही विरोध;

By काशिराम म्हांबरे | Updated: January 2, 2024 16:41 IST

राज्यातील शेकडो ट्रक व्यवसायिकांनी कोलवाळ येथे एकत्रीत येऊन नव्या हिट अँण्ड रन कायद्याला विरोध करीत निदर्शने केली.

काशिराम म्हांबरे 

म्हापसा: राज्यातील शेकडो ट्रक व्यवसायिकांनी कोलवाळ येथे एकत्रीत येऊन नव्या हिट अँण्ड रन कायद्याला विरोध करीत निदर्शने केली. तसेच आज मध्यरात्रीपासून सुरु होणाºया देशव्यापी बंदात सहभागी होऊन आपला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला.

नवीन दुरुस्ती ट्रक चालकांच्या हिताची नसल्यानेती मागे घेण्याची विनंती निदर्शकांनी केली.  या कायद्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदात गोव्यातील ट्रक व्यवसायिक सहभागी होऊन आपले समर्थन देणार असल्याची माहिती व्यवसायिक जोझफ रॉड्रिगीस यांनी दिली.

नव्या कायद्यानुसार हिट अँण्ड रनचा प्रकार घडल्यास १० वर्षाचा कारावास तसेच ७ लाख रुपयांचा दंड देण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्याला विरोध करताना  गरीब ट्रक चालकाला ही रक्कम जमा करणे शक्य होणार नसल्याची माहिती जोझफ रॉड्रिगीस यांनी दिली. गरीब व्यक्तीच चालकाची सेवा करतो. अशी व्यक्ती दंडाची मोठी रक्कम कशी जमा करु शकेल असाही प्रश्न त्यांनी केला. दंडाच्या रक्कमे एवढी रक्कम त्याच्याजवळ असती तर त्यांनी एखादा व्यवसाय सुरु केला असता असेही त्यांनी सांगितले.

अपघात घडल्यानंतर चुकी नसतानाही चालकालाच लोकांकडून मार खावा लागतो. मारहाण टाळण्यासाठी पळून जाणे भाग पडतेअसेराजू वाटिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय युनीयनाने पुकारलेल्या २४ तसांच्या बंदात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.