शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाच्या संपर्कात गोव्याचा तरुण; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 11:55 IST

इटलीला असताना कोरोना रुग्णाच्या संपर्कात; गोव्याचा तरुण रुग्णालयात देखरेखीखाली

पणजी : जहाजावर काम करणारा एक 27 वर्षीय गोमंतकीय तरुण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्याला खोकला, ताप आदींची लागण झाल्यामुळे गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात दाखल व्हावे लागले आहे. त्याच्या विषयीचा वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही. पण त्याला रुग्णालयात स्वतंत्रपणे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच गोमेकॉ रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. शिवानंद बांदेकर यांनी बुधवारी याबाबतची माहिती जाहीर केली. वास्को येथील सत्तावीस वर्षीय तरूण जून 2०19 पासून परदेशात जहाजावर होता. अनेक गोमंतकीय परदेशात जहाजावर नोकरीसाठी जात असतात. हा तरुण फिनलँड- युरोप येथे अडीच महिने जहाजावर होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात तो इटलीला पोहोचला होता. त्यावेळी तो कोरोना झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता. 138 क्रमांकाच्या कतार एअरवेजने तो गोव्यात आला. आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले, की त्याला गेले दोन दिवस खोकला व ताप आहे. त्याला गोमेकॉ इस्पितळात तातडीने दाखल करून घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून त्याला इस्पितळाच्या 113 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.मंत्री राणे म्हणाले, की आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक ते नमुने पाठवले आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेमधून अहवाल येईल. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. गोमेकॉत संशयावरून दाखल झालेला हा तिसरा गोमंतकीय आहे. यापूर्वीच्या दोघा गोमंतकीयांसह चौघा परदेशी पर्यटकांना उपचाराअंती रुग्णालयातून घरी जाऊ दिले गेले. त्यांच्याविषयीचा अहवाल नकारात्मक आला होता.गोमेकॉ रुग्णालय स्वत:ची स्वतंत्र वायरोलॉजी प्रयोगशाळा सुरू करणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला दरवेळी पुण्याच्या प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागणार नाही. गोमंतकीयांनी सध्या कोणती काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती आम्ही यापूर्वीच दिलेली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळायला हवे, असेही राणे यांनी म्हटले.

टॅग्स :corona virusकोरोना