शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

६ टक्के वीज दरवाढीला एकमुखी विरोध; सरकारने अधिक ओझे न टाकण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:21 IST

जनसुनावणीमध्ये आमदार, उद्योजकांकडून तीव्र भावना

लोकमत न्यूज नेटवर्क: आयोगाने सहा टक्के वीज़ दरवाढीसाठी बुधवारी पणजीत आयोजित केलेल्या जनसुनावणीत वीज दरवाढीला सर्वसामान्य लोकांसह राजकीय नेत्यांनी तीव्र विरोध केला. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते, तर मग विजेचा भारही सरकारनेच सोसावा. लोकांवर दरवाढीचे अतिरिक्त ओझे टाकू नये, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाचे नेते जनसुनावणीला उपस्थित होते. उद्योजकांसह सर्वसामान्य नागरिकांचीही यावेळी उपस्थिती होती. 

काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते युती आलेमाव यांनी सांगितले की, वीज खात्याने तीन वर्षांच्या बिझनेस प्लानमध्ये ३१ मार्च २०२५ पर्यंत दरवाढ करणार नसल्याचे सांगितले होते. मग वीज खात्यात नेमके काय चालले आहे. हे लोकांना समजले पाहिजे. वारंवार वीज जाणे आणि वीज खंडीत होणे यावर कोणीच काही बोलत नाही. सरकारने काही मिनिटांच्या शपथविधीसाठी ३३ लाख खर्च केले. मग ते विजेचा भार उचलू शकतातच. ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी वीज दरवाढ केली जाते हे हैर आहे, असे सांगत त्यांनी दर वाढीवर आक्षेप नोंदविला. आलेमाव यांनी आपले पत्र जेईआरसीच्या सचिवांना सादर केले. 

गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार वीज दरवाढ करू पाहत आहे. त्यांनी प्रस्ताव जेईआरसीला पाठविला आहे. २०२२ मझ्ये निवडणुका होत्या, तेव्हा वीज दरवाढ स्थगित ठेवली. आता दरवाढ करून त्रास दिला जात आहे. सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये सांगितले होते की, २४ तास वीज पुरवठा दिल्याखेरीज दर वाढवणार नाही. आता महागाईसुद्धा प्रचंड वाढली आहे. अशावेळी लोकांना दिलासा देण्याऐवजी दरवाढ केली जात आहे. 

गोवा फॉरवर्डचे नेते मोहनदास लोलयेकर म्हणाले, 'कोविड काळात लोकांना त्रास झाला. त्यातच सहा टक्के दरवाढ केल्यास लोकांना अधिक फटका बसेल. वीज खात्यासाठी ३६८ कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. हा सामान्य लोकांचाच पैसा आहे. सरकारने वीज खात्याला सबसिडी द्यावी. रस्त्यावर २४ तास वीज चालू असते, वीज चोरी सुरू आहे. हे सर्व बंद करा, असे लोलयेकर म्हणाले. जेआरई नव्हे तर सरकार वीज दरवाढ करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

जनसुनावणीपूर्वी वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी सुरुवातीला वीज खाते दरवाढ का करीत आहे, याची माहिती दिली. नंतर जनसुनावणी सुरू झाली. प्रस्तावित दरवाढीतून खात्याला २.३८५ कोटी मिळणार आहेत. आम्ही सहा टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. यातून १३४.९६ कोटींचा महसूल मिळेल. तरीही महसुलात ३४८ कोटींची तफावत असेल. त्याचे अर्थसंकल्पीयतरतुदीतून समायोजन केले जाईल, असे फर्नांडिस यांनी सांगितले. विजेचा वापर ३० ते ४० टक्के अधिक झाला आहे. ही वाढ पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेली नाही. वीज वारंवार जाण्याची समस्या सोडविण्यात येईल.

औद्योगिक वसाहतींचे शुल्क वाढवू नका : जीसीसीआय

कोरोना महामारीनंतर इंडस्ट्रीना फटका बसला आहे. तेव्हा औद्योगीक वसाहतीचे शुल्क वाढवू नये. २०१२ नंतर वीज खात्याचे ऑडीट केलेले अकाऊंट उपलब्ध नाहीत. खात्याने सर्व माहिती लोकांना आणि इंडस्ट्रींना दिलेली नाही, असे जीसीसीआयचे म्हणणे आहे. 

- आम आदमी पक्षाचे आमदार वैझी व्हिएगस यांनी कामाच्या वेळी जनसुनावणी ठेवल्याने नाखुशी दर्शविली. सर्व लोक सहभागी होऊ शकतात अशावेळी ही जनसुनावणी ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.

- घरगुती आणि व्यावसायिक दरात फार २ मोठा फरक दिसत नाही. घरगुती विजेचे दर वाढवू नयेत. इंडस्ट्रीजसाठी दर वाढविताना त्यांना २४ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

- सुनावणीवेळी आलेल्या मुड्यांची नोंद घेतली आहे. लोकांनी प्रश्न आणि शंका लोकांनी लेखी सादर कराव्यात. वीज खाते याची माहिती जेईआरसीला देईल, असे जेईआरसीचे सदस्य ज्योती प्रसाद यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :electricityवीजgoaगोवा